हेलिकॉप्टर दुर्घटना : पत्नीची अखेरपर्यंत खंबीर साथ


नवी दिल्ली : भारतीय संरक्षण दलाचे सीडीएस जनरल बिपीन रावत यांच्यासह त्यांच्या पत्नी मधुलिका रावतसह 13 जणांचे तामिळनाडूच्या कुन्नूरमधील निलगिरीच्या जंगलात हेलिकॉप्टरला झालेल्या अपघातात बुधवारी निधन झाले. बिपीन रावत यांच्या निधनामुळे संपूर्ण देशावर शोककळा पसरली आहे. पत्नी मधुलिका यांनी रावत यांना उभ्या आयुष्यभर त्यांना साथ दिली तर मृत्यूच्या क्षणीदेखील त्या त्यांच्या अखेरपर्यंत सोबत राहिल्या. या दुर्दैवी घटनेनंतर संपूर्ण देशभरातून हळहळ व्यक्त करण्यात आली.

कुटुंबातील अनेक जण सैन्यात
बिपीन रावत यांची 1 जानेवारी 2020 ला चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (सीडीएस) ऑफ इंडिया म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. रावत यांच्या कुटुंबातील अनेक जण भारतीय सैन्यात आहे. बिपीन रावत यांची पत्नी मधुलिका रावत ऑर्मी वाईव्स वेलफेअर असोसिएशनच्या अध्यक्ष होत्या. त्या सैन्यातील जवानांच्या पत्नी, लहान मुलांसाठी काम करायच्या. माहितीनुसार मधुलिका रावत यांनी मानसशास्त्रात दिल्ली विद्यापीठातून पदवी मिळवली होती. बिपीन रावत आणि मधुलिका रावत यांना दोन मुली आहे. एका मुलीचे नाव कृतिका रावत आहे. बिपीन रावत यांचे वडील लक्ष्मण सिंह देखील सैन्य दलात होते.






मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !