पाचोरा पालिकेकडून वाढीव घरपट्टी : हरकती नोंदवण्याचे काँग्रेसचे सचिन सोमवंशी यांचे आवाहन


पाचोरा : नगरपरीषदेत एकत्रीकरण टॅक्स वाढीसंदर्भात नोटीस बजावली असून याच्या विरोधात काँग्रेस मोफत हरकती नोंदवण्यासाठी मैदानात उतरली आहे. कोरोनामुळे करात 50 टक्के सूट देण्याची मागणी काँग्रेसचे सचिन सोमवंशी यांनी केली आहे.

मोहिमेत सहभागाचे आवाहन
पाचोरा नगरपरीषदेने 2020 ते 2024 पर्यंतचा एकत्रीकरण टॅक्स हा दहा टक्क्यांनी वाढविण्यासाठी शहरातील जवळपास 20 ते 25 हजार घरे, दुकाने, आदी मालमत्ता धारकांना नोटीस न. पा. अधिनियम 1965 च्या नियमाने बजावली आहे मात्र शहरातील भोळ्या भाबड्या नागरीकांना या नोटीस चा अर्थच कळलेला नाही. या नोटीसीवर हरकती 17 डिसेंबरपर्यंत मागविण्यात आल्या आहेत. हरकतीबाबतची मुदत ही पुरेशी नसल्याने वाढवून द्यावी, अशी मागणी काँग्रेस तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी केली आहे. यावर प्रत्येक नागरीकांनी आपली टॅक्सची पावती शहरातील नवकांर प्लाझा येथील सचिन मेडीको येथे जमा करायची असून ती जमा करताना हरकतीचा अर्ज मोफत मिळणार असून त्यावर स्वाक्षरी करावी, असे आवाहन सोमवंशी यांनी केले आहे.






मोफत हरकत नोंदवण्याचे आवाहन
कोरोना महामारीमुळे शहरातील व्यापारी पेठ उद्ध्वस्त झाली असून नगरपालिकेने आहे त्या टॅक्समध्ये 50 टक्के सुट द्यावी, अशी मागणी देखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे नागरींकाच्या सहीने करण्यात येणार असल्याचे सोमवंशी यांनी सांगितले. मालमत्ता धारकांनी जर हरकत घेतली नाही तर आपल्या ला टॅक्स मान्य आहे, असे समजले जाईल म्हणून प्रत्येकाने निष्काळजीपणा न करता तत्काळ काँग्रेस पक्षाच्या मोफत हरकत मोहिमेत सहभागी व्हावे, असे आवाहन काँग्रेसने केले आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !