18 वर्षीय युवकाची आत्महत्या : वाघ नगरातील घटना


जळगाव : जळगाव शहरातील वाघ नगरात राहणार्‍या 18 वर्षीय तरुणाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना मंगळवारी सायंकाळी 5 वाजता उघडकीस आली. या प्रकरणी रामानंदनगर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. करण संजय शिंदे (18, रा.वाघ नगर) असे मयत तरुणाचे नाव आहे.

आत्महत्येचे कारण अस्पष्ट
करण संजय शिंदे (18, रा. वाघ नगर, जळगाव) हा तरुण आई-वडील व भावासोबत वास्तव्यास होता. मंगळवार, 14 डिसेंबर रोजी दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास करणने राहत्या घराच्या वरच्या मजल्यावर गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे उघडकीस आले. तरुणाच्या आत्महत्येचे कारण अद्याप कळू शकले नाही. दरम्यान, बाजूच्या खोलीत झोपलेला लहान भाऊ नितीन याच्या लक्षात ही बाब येताच त्याने तातडीने शेजार्‍यांच्या मदतीने मृतदेह खाली उतरवून जिल्हा वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केला. यावेळी वैद्यकीय अधिकारी यांनी त्यास मृत घोषित केले. याप्रकरणी रामानंदनगर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. मयताच्या पश्चात आई शारदा, नितीन आणि वडील संजय आनंदा शिंदे असा परीवार आहे. प्राथमिक तपास एएसआय सुरेश लोखंडे करीत आहे.







मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !