चारचाकीचे कव्हर जाळले : दोघांविरोधात गुन्हा
जळगाव : शहरातील शिवाजी नगरातील भुरे मामलेदार बगीच्याजवळ एका कारचे कव्हर जाळून नुकसान केल्याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
दोघांविरोधात गुन्हा
दीपक शरद चौधरी (34, रा.कोल्हे नगर, जळगाव) हे मार्केटिंगचा व्यवसाय करतात. मंगळवार, 14 डिसेंबर रोजी दुपारी 2 ते 3 वाजेच्या दरम्यान ते शहरातील शिवाजीनगर भागात असलेल्या भुरे मामलेदार बगीच्या जवळील प्लॉट नंबर 3 जवळ त्यांनी त्यांची चारचाकी कार (एम.एच.19 सी.एफ 1723) लावली असता शिवाजी नगरातील अक्षय संजय अकोलकर आणि त्याच्यासोबत असलेल्या अज्ञात व्यक्तीने कारचे कव्हर जाळून नुकसान केले. या संदर्भात दीपक चौधरी यांनी शहर पोलीस ठाण्यात धाव घेऊन याबाबत तक्रार दिल्याने संशयीत आरोपी अक्षय संजय अकोलकर व अज्ञात व्यक्तीवर सायंकाळी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलिस नाईक करुणासागर जाधव करीत आहे.





