पत्नीच्या नावाने बनावट स्वाक्षर्‍या करीत रक्कम काढणार्‍या पतीविरोधात गुन्हा


जळगाव : कौटुंबिक वाद न्यायालयात सुरू असतांना पत्नीच्या बनावट सह्या आणि कागदपत्र सादर करून बँक खात्यातून परस्पर पैसे काढून घेणार्‍या पतीविरोधात एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

दाम्पत्यात कौटुंबिक वाद
पाचोरा तालुक्यातील जोगे तांड येथील माहेर आलेल्या प्रतिभाबाई भोजू राठोड यांचा विवाह जळगाव तालुक्यातील रामदेववाडी येथील भोजू बंद्री राठोड यांच्याशी 8 मे 2011 रोजी झाला आहे. दरम्यान लग्न झाल्यानंतर पती-त्नी हे दोन्ही जैन कंपनीत कामास होते. त्यानंतर पती पत्नीचा कौटुंबिक वाद सुरू होता. हा वाद न्यायालयात पोहचल्याने प्रतिभाबाई या 20 मार्च 2019 रोजी मुलाला घेवून माहेरी निघून गेल्या. प्रतिभाबाई यांनी केलेल्या कामांचा पगार त्यांच्या खात्यात जमा होता. दरम्यान, पती भोजू बंद्री राठोड याने 7 एप्रिल 2020 ते 8 जुलै 2020 दरम्यान, पत्नीच्या नावाच्या बनावट सह्या करून त्यांच्या वेळोवेळी खात्यातून एकूण 62 हजार 400 रुपये काढून घेतले. विवाहिता माहेरहून पैसे काढण्यासाठी जैन कंपनीसमोर असलेल्या एका बँकेत आले असता त्यांच्या खात्यात पैसे नसल्याचे समोर आले. त्यांनी अधिक चौकशी केली असता त्यांचे पती भोजू राठोड याने त्यांच्या नावाच्या बनावट सह्या करीत परस्पर पैसे काढल्याचा प्रकार समोर आला. या प्रकरणी विवाहितेने मंगळवारी 14 डिसेंबर रोजी एमआयडीसी पोलिस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून संशयीत आरोपी भोजू राठोड याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सहा.निरीक्षक अमोल मोरे करीत आहे.







मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !