बेकायदेशीर दारूची विक्री : तिघांना अटक
जळगाव : तालुक्यातील आमोदा व डिकसाई येथे बेकायदेशीररीत्या देशी-विदेशी दारू बागळणार्या तिघांवर पोलिसांनी कारवाई करीत 10 हजार 525 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी जळगाव तालुका पोलिस ठाण्यात तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
जळगाव तालुका पोलिसांची कारवाई
जळगाव तालुक्यातील आमोदा खुर्द आणि डिकसाई येथे काही व्यक्ती बेकायदेशीर देशी, विदेशी व गावठी हातभट्टी दारूची विक्री करत असल्याची गोपनीय माहिती तालुका पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांना मिळाली. त्यानुसार तालुका पोलिस ठाण्याचे पोलीस कर्मचारी उपनिरीक्षक नयन पाटील, हवालदार विश्वनाथ गायकवाड, नरेंद्र पाटील, प्रकाश चिंचोरे, दिपक कोळी, अशोक महाले, संजय भालेराव आणि अनिल तायडे यांनी मंगळवार, 14 डिसेंबर रोजी सायंकाळी धडक कारवाई करत आमोदा येथे दिलीप सुकलाल कोळी (आमोदा खुर्द, ता.जि.जळगाव) आणि मंगा झिपरू भिल (आमोदा) यांच्याकडून दारूच्या बाटल्या व गावठी हातभट्टीची दारू मिळून पाच हजार 660 रुपयांचा मद्यासाठा जप्त केला तर तालुक्यातील डिकसाई येथे भास्कर चिंतामण पाटील (डिकसाई, ता.जि.जळगाव) येथे कारवाई करीत चार हजार 865 रुपये किंमतीच्या दारूच्या 55 बाटल्या जप्त करण्यात आल्या. या प्रकरणी तिघांविरोधात जळगाव तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास हवालदार विश्वनाथ गायकवाड करीत आहे.





