जळगाव पोलिस मुख्यालयासमोरून तरुणाचा धूमस्टाईल मोबाईल लांबवला


जळगाव : शहरातील पोलिस मुख्यालयासमोरून पायी जाणार्‍या तरुणाच्या हातातील महागडा मोबाईल हिसकावून दुचाकीने दोन जणांनी पळ काढला. या प्रकरणी अज्ञात दोघा भामट्यांविरोधात जळगाव जिल्हा पेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

जिल्हापेठ पोलिसात गुन्हा
हर्षल सुरेश पांडे (35, रा.विजय कॉलनी, जळगाव) हा तरुण सोमवार, 13 डिसेंबर रोजी रात्री नऊ वाजेच्या सुमारास शहरातील पोलिस मुख्यालयासमोरील गाजरे हॉस्पीटलसमोरून मोबाईलवर बोलत पायी जात असतांना त्यांच्या पाठीमागून अज्ञात दोन जण दुचाकीने येवून त्यांच्या हातातील 10 हजार रूपये किंमतीचा महागडा मोबाईल जबरीने हिसकावून पळ काढला. हर्षलने आरडाओरड केली परंतु दोघे दुचाकीवर धुमस्टाईल पसार झाले. या प्रकरणी हर्षल पांडे यांनी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यावरून जिल्हा पेठ पोलिस ठाण्यात अज्ञात दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास हवालदार महेंद्र पाटील करीत आहेत.







मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !