ब्रेकींग न्यूज : महाराष्ट्रात बैलगाडा शर्यतीला सशर्त परवानगी


मुंबई : सुप्रीम कोर्टाने महाराष्ट्रात बैलगाडा शर्यतीला सशर्त परवानगी दिल्याने बैलगाडा मालकांना मोठा दिलासा मिळाला आहे. गेल्या अनेक वर्षापासून महाराष्ट्रभर चर्चेत असणार्‍या बैलगाडा शर्यतीवरील बंदीविषयी गुरुवारी सुप्रीम कोर्टात सुनावणी पार पडली. या सुनावणीकडे संपूर्ण महाराष्ट्रातील बैलगाडा प्रेमींचे लक्ष लागून राहिले होते.

नियम पाळून शर्यतीचे आयोजन : खासदार कोल्हे
महाराष्ट्र सरकारने जी नियमावली तयार केली आहे त्यानुसार यापुढे बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात येणार आहे, अशी प्रतिक्रिया शिरुरचे खासदार अमोले कोल्हे यांनी दिली. ते म्हणाले की, सुप्रीम कोर्टाचे मी आभार मानतो. बैलगाडा प्रेमींसाठी ही आनंदाची बातमी आहे. महाविकास आघाडीने जोर लावण्याने हा निर्णय आला आहे. दिलीप वळसे पाटील, सुनील केदार, बंटी पाटील या सर्वांना मी धन्यवाद देतो. सर्व बैलगाडा मालकांचे अभिनंदन करतो. हा ग्रामीण भागातील लोकांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न होता.






शेतकरीवर्गात मोठा आनंद : गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील
शेतकर्‍यांचा वर्षानुवर्षे सुरू असलेला या खेळावर बंदी आणल्याने शेतकरी नाराज झाले होते. गेली काही वर्षे आम्ही सर्व जण बंदी उठवण्यासाठी प्रयत्न करत होतो. राज्य सरकारने मुकूल रोहतगी यांच्यासारखे अतिशय मोठे वकिल या प्रकरणासाठी उभे केले होते. आजच्या निर्णयानंतर मला खूप आनंद झाला आहे. महाराष्ट्रातल्या सगळ्या शेतकरी वर्गाला याचा आनंद झाला आहे, अशी प्रतिक्रिया राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी दिली आहे.

संकट उभे राहणार नाही याची काळजी घ्या
माझी शेतकर्‍यांना विनंती आहे. सुप्रीम कोर्टाने अटी घालून परवानगी दिली आहे. त्यामुळे शेतकर्‍यांनी अटीशर्थींचे पालन करुन या शर्यती भरवल्या पाहिजेत आणि आनंद घेतला पाहिजे. कुठली चुकीची गोष्ट करुन परत संकट उभे राहणार नाही याची काळजी सर्व शेतकर्‍यांनी घेतली पाहिजे, असे दिलीप वळसे-पाटील म्हणाले.

भुसावळात पोलिसांचे कोम्बिंग : वॉण्टेडसह तिघे संशयीत जाळ्यात 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !