धक्कादायक : जळगाव जिल्ह्यात साडेसात कोटींची वीज चोरी


जळगाव : जळगाव परीमंडळात गेल्या आठ महिन्यांत पाच हजार 103 वीज चोरांवर कारवाई करण्यात आली आहे. या ग्राहकांनी 55 लाख 9 हजार 574 युनिटची तब्बल सात कोटी 53 लाख रुपयांची वीजचोरी केली. वीज चोरीची बिले न भरणार्‍या ग्राहकांवर पोलिसांत गुन्हे दाखल करण्याचा इशारा महावितरणने दिला आहे.

वीज कंपनीने राबवली धडक मोहिम
जळगाव, धुळे व नंदुरबार जिल्ह्यांत वीजचोरी पकडण्यासाठी महावितरणतर्फे सातत्याने मोहिमा राबविण्यात येत आहेत. यात आकडा टाकून वीजचोरी करणार्‍यांसह मीटरमध्ये छेडछाड करून वीज चोरणार्‍यांवर धडक कारवाई करण्यात येत आहे.






वीज कंपनी वसुल करणार वीज चोरीचा दंड
जळगाव परी मंडळात एप्रिल-2021 ते नोव्हेंबर -2021 या आठ महिन्यांत मोठ्या संख्येने वीज चोरीची प्रकरणे उघडकीस आली. यात जळगाव जिल्ह्यात 3680 प्रकरणांत 41 लाख 52 हजार 610 युनिटची 5 कोटी 42 लाख, धुळे जिल्ह्यात 803 प्रकरणांत 6 लाख 59 हजार 707 युनिटची 91 लाख तर नंदुरबार जिल्ह्यात 620 प्रकरणांत 6 लाख 97 हजार 257 युनिटची 1 कोटी 20 लाख रुपयांची वीजचोरी महावितरणच्या मोहिमांत निदर्शनास आली. एकूण 5103 प्रकरणांत विजेच्या अनधिकृत वापराची 201 प्रकरणे उघडकीस आली. आकडा टाकून थेट वीज चोरल्याची 2226 प्रकरणे तर मीटरमध्ये छेडछाड करून वीजचोरी केल्याची 2676 प्रकरणे आहेत. या सर्व ग्राहकांना 7 कोटी 53 लाख रुपये वीज चोरीची बिले देण्यात आली.

 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !