धक्कादायक ! : दहा वर्षीय बालिकेने दिला बाळाला जन्म… या राज्यातील घटना


 

मोहाली पंजाब : देशभरातील अनेक राज्यांमध्ये महिलांवरील लैंगिक अत्याचार, विनयभंग आणि बलात्काराच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. अशाच प्रकारची घटना बिहारमध्ये घडली असून या बलात्काराच्या घटनेनंतर 10 वर्षाच्या बालिकेने एका मुलाला जन्म दिला असून या प्रकरणी बालिकेच्या तक्रारीनंतर तरुणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.





नवजात स्त्री जातीच्या अर्भकाला सोडून माता पसार ; रावेर तालुक्यातील प्रकार

तरुणाविरोधात गुन्हा दाखल
पंजाबमधील मोहालीमध्ये 10 वर्षीय बलात्कार पीडितेने मुलाला जन्म दिला आहे. अल्पवयीन मुलीच्या तक्रारीवरून सोहाना पोलिसांनी अज्ञात तरुणाविरुद्ध बलात्कार आणि पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. खरे तर हे प्रकरण बिहारमधील भोजपूर जिल्ह्यातील कोयलशूर भागाशी संबंधित आहे. त्यामुळे पोलिसांनी या प्रकरणी शून्य एफआयआर नोंदवून संबंधित बिहार पोलीस ठाण्यात वर्ग केला आहे.

निर्जनस्थळी अत्याचाराचा आरोप
पोलिसांना दिलेल्या तक्रारीत 10 वर्षीय अल्पवयीन मुलीने सांगितले की, मार्च 2021 मध्ये ती बिहारमध्ये होती आणि तिथल्या शेतात रोजंदारीवर काम करणार्‍यांना ती अन्नपाणी पोहोचवत असे. यादरम्यान पीडित मुलीला एका तरुणाला भेटला व त्याने मुलीला त्याच्या गोड बोलण्यात अडकवले. दुसर्‍या दिवशी पीडित तरुणी पुन्हा रोजंदारीवर जेवण देण्यासाठी शेतात पोहोचली. त्याचवेळी या तरुणाने तिला निर्जनस्थळी नेले. तेथे त्याने तिच्यावर बलात्कार केला. कुणाला याविषयी सांगितल्यास जीवे मारण्याची धमकीही दिली. या भीतीमुळे पीडितेने कुटुंबीयांना काहीही सांगितले नाही. मे महिन्यात हे कुटुंब पंजाबात मोहालीत येऊन राहू लागले. त्यानंतर डिसेंबरमध्ये मुलीच्या पोटात दुखू लागल्याने कुटुंबीय तिला डॉक्टरांकडे घेऊन गेले. तेथे डॉक्टरांनी ती गर्भवती असल्याचे सांगितले. आता या अल्पवयीन मुलीने मुलाला जन्म दिला आहे. दुसरीकडे, पोलिसांनी अल्पवयीन मुलीच्या तक्रारीवरून एफआयआर नोंदवला असून हे प्रकरण बिहारमधील संबंधित पोलिस ठाण्यात पाठवले आहे.

लग्नाच्या आमिषाने पोलिस हवालदाराचा वकील तरुणीवर बलात्कार

 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !