मोक्काच्या भितीनेच गिरीश महाजनांना कोरोना ; माजी मंत्री खडसेंचा खळबळजनक आरोप
मुक्ताईनगर : माजी मंत्री एकनाथराव खडसे (Eknath Khadse) व माजी मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांच्यातून विस्तव जात नाही हे उभ्या महाराष्ट्राला एव्हाना ठावूक झाले आहे. खडसे यांना कोरोना झाल्यानंतर महाजनांनी टिकेची तोफ डागली होती तर गिरीश महाजनांना (Girish Mahajan) दुसर्यांदा कोरोना झाल्यानंतर माजी मंत्री खडसे यांनी महाजनांवर टिकेचे बाण चालवले आहेत. महाजनांवर मोक्का लावण्याची प्रक्रिया सुरू झाल्यानेच त्यांना कोरोना तर झाला नाही ना? असा संशय आहे, असे विधान राज्याचे माजी महसूलमंत्री एकनाथराव खडसे (Eknath Khadse) यांनी माध्यमांशी बोलताना केल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात प्रचंड खळबळ उडाली आहे.
महाजनांनी खडसेंवर केला होता हा आरोप
माजी मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी एकनाथराव खडसे (Eknath Khadse) यांना दुसर्यांना कोरोना झाला त्यावेळी काही सवाल उपस्थित करत टीका केली. एकनाथराव खडसे यांच्यामागे ईडीची चौकशी लागते, तेव्हाच कोरोना होतो, असे महाजन त्यावेळी म्हणाले होते.




महाजनांच्या टिकेला खडसेंचे प्रत्त्युत्तर
श्री क्षेत्र शिरसाळा येथे दर्शनासाठी माजी मंत्री खडसे (Eknath Khadse) हे कार्यकर्त्यांसमवेत आले असता माध्यमांनी (Media) त्यांच्याशी संवाद साधला. याप्रसंगी खडसे यांनी माजी मंत्री गिरीश महाजनांना (Girish Mahajan) टोला लगावताना सांगितले की, गिरीश महाजनांच्या (Girish Mahajan) मागे मोक्का लावण्याची प्रक्रिया बहुतेक सुरू असावी कारण दुसर्यांदा त्यांना कोरोना झाला आहे मात्र माझी ईश्वरचरणी प्रार्थना आहे आहे, गिरीशभाऊ लवकर बरे व्हावे, त्यांची समाजाला आणि महाराष्ट्राला गरज आहे, त्यामुळे मी त्यांच्यासाठी प्रार्थना करणार आहे, असेही ते म्हणाले. यावेळी भुसावळचे नगरसेवक प्रा.सुनील नेवे (Sunil Neve), योगेश कोलते (Yogesh Kolte) व कार्यकर्ते उपस्थित होते.