फैजपूरातील पिता-पूत्रांवर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार ; आत्महत्येपूर्वी लिहिल्यात चिठ्ठीत म्हटले आहे की…!


फैजपूर : सहा वर्षीय मुलाला गळफास देत पित्यानेही गळफास घेत आत्महत्या (Suside) केल्याची धक्कादायक घटना फैजपूर (Faijpur) शहरातील बसस्थानकाच्या मागे असलेल्या मिरची ग्राऊंड येथे शुक्रवार, 7 जानेवारी रोजी दुपारी उघडकीस आली. आर्यन निलेश बखाल (6) (Aryan Nilesh Bhakhal) असे मयत मुलाचे तर निलेश घनश्याम बखाल (35, मूळ रा.विवरे, ता.रावेर, ह.मु. बसस्थानकाच्या मागे मिरची ग्राऊंड, फैजपूर) (Nilesh Bhakhal) असे आत्महत्या केलेल्या पित्याचे नाव आहे. ही घटना नेमकी कशामुळे घडली? याबाबत अद्याप स्पष्ट कारण समोर आलेले नाही मात्र मृत्यूपूर्वी निलेश यांनी चिठ्ठी लिहिली असू त्यात स्वःखुषीने आत्महत्या करीत असल्याचा उल्लेख आहे. दरम्यान, मृत पिता-पूत्रांवर शुक्रवारी सायंकाळी उशिरा शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी कुटुंबियांनी मन हेलावणारा आक्रोश केला.

डेअरीच्या चालकाच्या आत्महत्येनंतर फैजपूरात खळबळ
बापू डेअरीचे संचालक असलेल्या निलेश घनश्याम बखाल (35) (Nilesh Ghansham Bhakhal) यांनी अलीकडेच शहरात डेअरी सुरू केली होती मात्र शुक्रवारी सकाळी 11.30 वाजेच्या सुमारास त्यांचा सहा वर्षीय मुलगा आर्यनसह निलेश यांचा गळफास (Hanging) घेतलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळल्यानंतर शहरात मोठी खळबळ उडाली. निलेश यांनी शुक्रवारी सकाळी 11.30 वाजेच्या सुमारास पत्नीला बाजार व किराणा आणण्यासाठी बाजारात सोडल्यानंतर ते घरी परतले व सहा वर्षीय आर्यनला गळफास देवून ठार केले व नंतर स्वतःदेखील आत्महत्या (Suside) केली.





पत्नी घरी आल्यानंतर उघड झाला प्रकार
बाजारासाठी गेलेल्या निलेश यांच्या सौभाग्यवती घरी आल्यानंतर घराचा दरवाजा बंद दिसून आला शिवाय दरवाजा ठोठावून कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने शेजारच्यांच्या मदतीने दरवाजा उघडण्यात आला असता पिता-पुत्रांचे मृतदेह पाहता त्यांना जबर मानसिक आघात बसला. ही घटना वार्‍यासारखी फैजपूर शहरात पसरताच मोठी खळबळ उडाली आहे. तातडीने दोघांना यावल ग्रामीण रुग्णालयात (Yawal Rural Hospital) दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी डॉ. शुभम तिळके यांनी मयत घोषीत केले. या घटनेमागचे कारण स्पष्ट झालेले नाही. याप्रकरणी फैजपूर पोलिस ठाण्यात (Faijpur Police Station) अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. सहाय्यक पोलिस निरीक्षक सिद्धेश आखेगावकर व सहकार्‍यांनी घटनास्थही धाव घेत पाहणी केली.

वडिलांशी झालेले ‘ते’ संभाषण ठरले अखेरचे
निलेश यांनी आत्महत्या करण्यापूर्वी एक तास आधी आपल्या वडीलांशी मोबाईलवरून संपर्क साधला होता. आपण आनंदात असून पुढच्या आठवड्यात विवरा येथे येतो, असे नीलेश (Nilesh Bhakhal) वडिलांशी भ्रमणध्वनीवरून सांगितले होते शिवाय नवीन व्यवसाय चांगला सुरू असून सुरू आहे त्यामुळे इतर कामांसाठी वेळ मिळत नाही, असे देखील निलेश वडिलांना म्हणाला होता तर आजोबांशी मृत आर्यननेही संवाद साधला होता मात्र तासाभरातच मुलगा अन् नातवाच्या मृत्यूची बातमी विवरे गावात धडकल्याने वडील घनश्याम बखाल यांना जबर धक्का बसला तर त्यांच्या आप्तांच्या आक्रोशाने समाजमन हेलावले.

आत्महत्येपूर्वी लिहिली चिठ्ठी
मयत निलेश बखाल (Nilesh Bhakhal) यांनी आत्महत्या (Suside) करण्यापूर्वी एक चिठ्ठी लिहिली आहे.आपण स्व-खुशीने आत्महत्या (Suside) करीत असून त्यास कुणालाही जवाबदार धरू नये, मी आर्यनला सोबत नेत आहे, असा त्यात उल्लेख आहे. पोलिसांनी ही चिठ्ठी जप्त केली आहे. दरम्यान, पिता-पूत्रांवर शोकाकुल वातावरणात शुक्रवारी सायंकाळी विवरे, ता.रावेर (Vivare, Tal.Rawer) येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी आप्तेष्टांनी मन हेलावणारा आक्रोश केला.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !