भुसावळ रोटरी रेल सिटीतर्फे गरीब विद्यार्थ्यांना स्वेटर वाटप
भुसावळ : रोटरी क्लब ऑफ भुसावळ रेलसिटीतर्फे भुसावळ तालुक्यातील जोगलखेडा आणि भानखेडा येथील जि.प.शाळेतील विद्यार्थ्यांना मोफत स्वेटर वाटप करण्यात आले. दोन्ही शाळा मिळून 69 विद्यार्थ्यांना तसेच दोन शाळा बाह्य विद्यार्थ्यांना स्वेटर वाटप करण्यात आले.
यांची कार्यक्रमास उपस्थिती
प्रसंगी सरपंच सारीका पाटील, उपसरपंच जानकीराम कोळी, सदस्य गजेंद्र पाटील, ग्रामसेवक प्रतिभा तायडे, रोटरी रेलसिटी अध्यक्ष हरविंदरसिंग थेटी, प्रकल्प प्रमुख तेजस नवगाळे, विकास पाचपांडे, चेतन पाटील, सोनू मांडे, विशाल शहा, महेश चौधरी आदींची उपस्थिती. शिक्षक गणेश फेगडे यांनी सूत्रसंचालन केले. यशस्वीतेसाठी जितेंद्र झांबरे, सुधीर तायडे, सोनाली तायडे यांनी परीश्रम घेतले.


