भोळे महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी कोविड लसीकरण शिबिर
भुसावळ : दादासाहेब देविदास नामदेव भोळे महाविद्यालयात 15 ते 18 वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी कोविड लसीकरण शिबिराचे मंगळवारी आयोजन करण्यात आले. उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आर.पी.फालक यांनी केले. प्राचार्यांनी लस घेण्याचे महत्व सांगत शासन आणि आरोग्य विभागाने दिलेला सूचनांचे पालन करण्याचे आवाहन केले. वैद्यकीय अधिकारी डॉ.संदीप जैन यांनी कोरोना विषाणूची लागण झाल्यास शरीरावर होणार्या दीर्घकालीन दुष्पपरीणामांची माहिती दिली.
यांची शिबिरप्रसंगी उपस्थिती
प्रसंगी नगरपालिका रुग्णालयातर्फे डॉ.संदीप जैन यांच्यासह सिस्टर पूनम साहेबराव इंगळे, आशा कार्यकर्त्या आशा प्रकाश खराटे, डाटा एंट्री ऑपरेटर हर्षल चौधरी उपस्थित होते. प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रम अधिकारी प्रा.डॉ.जी.पी.वाघुळदे तर सूत्रसंचालन सहा.कार्यक्रम अधिकारी प्रा.डॉ.दयाधन एस.राणे यांनी केले. महिला कार्यक्रम अधिकारी प्रा.निर्मला वानखेडे यांच्यासह विद्यार्थी विकास अधिकारी प्रा.डॉ.जगदीश चव्हाण, प्रा.डॉ.आर.बी.ढाके, प्रा.डॉ.संजय चौधरी, प्रा.अनिल सावळे, प्रा.अनिल नेमाडे, प्रा.के.व्ही.धांडे, प्रा.आशिष महाजन आदींसह शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित असल्याचे महाविद्यालयाचे प्रसिध्दी प्रमुख प्रा.डॉ.संजय चौधरी यांनी कळवले आहे.


