ट्रॅक्टर अपघातात एकाचा मृत्यू : डांभूर्णीच्या आरोपीस सहा महिने शिक्षा

यावल न्यायालयाचा निकाल : मयताच्या वारसाला पाच हजार भरपाई देण्याचेही आदेश


यावल : भरधाव वेगातील ट्रॅक्टर उलटून झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी यावल पोलिसात (Yawal Police) गुन्हा दाखल करण्यात आला होता. यावल न्यायालयात (Yawal Court) खटल्याचे कामकाज चालले. दोषी चालकास सहा महिने कारावास व तीन हजार रुपये दंडाची शिक्षा यावल न्यायालयाचे (Yawal Court)  न्या.एम.एस.बनचरे यांनी सुनावली.

यावल न्यायालयाने सुनावली शिक्षा
या खटल्याची माहिती अशी की संशयीत आरोपी तथा डांभूर्णीतील रहिवासी प्रकाश भीमसिंग बारेला याने आपल्या ताब्यातील ट्रॅक्टर भरधाव वेगात चालवल्याने ते साकळी शिवारातील पाटचारीत उलटले होते. या अपघातात मजुर सुकलाल लालसिंग बारेला (Suklal Lalsing Barela) यांचा मृत्यू झाला. 17 एप्रिल 2017 रोजी हा अपघात घडला होता. यावल पोलिसात (Yawal Police)  गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर यावल न्यायालयात (Yawal Court)  खटल्याचे कामकाज चालले. या खटल्यात साक्षी साक्षीदारांच्या साक्षी नोंदवण्यात आल्या. या खटल्यात संशयीत आरोपीचा मुलगा आकाश याची साक्ष महत्वपूर्ण ठरली व मुलाने अपघातच्या वेळी वडिल हेच ट्रॅक्टर चालवत असल्याचे निदर्शनास आणून दिले. या गुन्ह्याचा तपास सहाय्यक फौजदार राजेंद्र पाटील यांनी केला. दरम्यान, न्या.एम.एस.बनचरे यांनी आरोपी प्रकाश बारेला यास सहा महिने साध्या कारावासाची शिक्षा व तीन हजार रुपये दंड (Fine) सुनावला तसेच पाच हजार रुपये नुकसान भरपाई मयत सुकलालचे वडील लालसिंग बारेला यांना देण्याचा आदेश दिला. या खटल्यात सरकारतर्फे सरकारी वकील अ‍ॅड.नितीन खरे (Add.Nitin Khare) तर आरोपी प्रकाश बारेलातर्फे अ‍ॅड.गौरव पाटील यांनी काम पाहिले. सरकारी वकील अ‍ॅड.नितीन खरे (Add.Nitin Khare) यांना पैरवी अधिकारी हवालदार उल्हास राणे यांनी मदत केली.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !