पंतप्रधानांच्या सुरक्षेत त्रृटी : रावेरात भाजपाचे प्रशासनाला निवेदन


रावेर : भाजपा ओबीसी मोर्चा रावेरच्या वतीने खासदार रक्षा खडसे यांच्या नेतृत्वात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेत पंजाबमध्ये झालेल्या हलगर्जीबाबत रावेर तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. पंजाबमधील जनतेसाठी विविधविकास कामांचे लोकार्पण करण्यासाठी पंतप्रधान जात असताना त्यांच्या गाड्यांचा ताफा खलिस्तानी संघटनांकडून रस्त्यावर थांबविण्यात आला होता. पंजाब सरकारने जाणूनबुजून प्रधानमंत्र्यांच्या सुरक्षेमध्ये हलगर्जीपणा करून त्यांच्या जीवास धोका निर्माण केल्याचा आरोप करीत पंजाब सरकारचा निषेध करण्यात आला.

यांची होती उपस्थिती
यावेळी खासदार रक्षा खडसे, उत्तर महाराष्ट्र किसन मोर्चा प्रमुख सुरेश धनके, जिल्हा उपाध्यक्ष नंदू महाजन, पद्माकर महाजन, तालुकाध्यक्ष राजन लासुरकर, तालुका सरचिटणीस सी.एस.पाटील, महेश चौधरी, ओबीसी मोर्चा तालुकाध्यक्ष अतुल महाजन, भाजयुमो तालुकाध्यक्ष महेंद्र पाटील, पंचायत समिती सदस्य जुम्मा तडवी, पी.के.महाजन, संदीप सावळे, हरलाल कोळी, राहुल सोनार, दिगंबर महाजन, प्रवीण मोरे, सुधाकर पारधी, विजय महाजन, संजय महाजन आदी उपस्थित होते.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !