भुसावळ-पुणे ‘हुतात्मा एक्स्प्रेस’ धावणार !

रेल्वे मुख्यालयाच्या सूचनांमुळे रेल्वे प्रवाशांच्या आशा पल्लवित


भुसावळ : कोरोनाचा उद्रेक झाल्यानंतर 22 महिन्यांपूर्वी बंद झालेली भुसावळ-पुणे हुतात्मा एक्स्प्रेस लवकरच सुरू होण्याचे संकेत आहेत. त्यासाठी भुसावळ डीआरएम कार्यालयाने जीएम कार्यालयाकडे प्रस्ताव पाठवला आहे. आता मुंबई मुख्यालयाकडून पुणे आणि सोलापूर विभागाला हुतात्मा एक्स्प्रेसचे डबे (बोगी) तयार ठेवावे, असे सांगितले. त्यामुळे 19 जानेवारीनंतर ही गाडी प्रवाशांच्या सेवेत दाखल होऊ शकते.

लॉकडाऊनमुळे गाडी बंदच
कोरोना लॉकडाउन सुरू होताच भुसावळ ते पुणे धावणारी हुतात्मा एक्स्प्रेस ही गाडी बंद करण्यात आली. मध्यंतरी मनमाड, दौंडपर्यत ही गाडी आठवडाभर चालवली होती. मात्र, नंतर तिला पुन्हा ब्रेक लागले. मात्र, प्रवाशांकडून होणारी मागणी पाहता ही गाडी पुढील आठवड्यात सुरू होण्याचे संकेत मध्य रेल्वे प्रशासनाने दिलेे. प्रशासनाने सोलापूर व पुणे विभागाला हुतात्मा एक्स्प्रेसचे डबे तयार ठेवण्याच्या सूचना केल्या आहेत. हुतात्मा एक्स्प्रेस ही गाडी सोलापूर-पुणे अशी धावते. तिलाच पुणे-भुसावळ नावाने भुसावळपर्यंत वाढवल्याने भुसावळातून पुण्याला जाणार्‍यांची सोय होते. दरम्यान, या तयारीबाबत येथील अधिकारी अनभिज्ञ असले तरी पुणे, सोलापूर येथील अधिकार्‍यांनी दुजोरा दिला.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !