भुसावळातील बाबा पहेलवानाविरोधात गुन्हा ; जाणून घ्या नेमके कारण
भुसावळ : न्यायालयीन आदेशाचे उल्लंघण केल्याप्रकरणी मकसुदअली वाजीद अली उर्फ बाबा पहेलवान (आगाखान वाडा, भुसावळ) (Baba Pahelwan) विरोधात भुसावळ बाजारपेठ पोलिसात (Bhusawal Bazarpet Police Station) शनिवारी गुन्हा दाखल करण्यात आला. बाबा पहेलवान यांच्याविरोधात एका प्रकरणात बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल आहे.
या कारणास्तव दाखल झाला गुन्हा
संशयीताला न्यायालयाने (Bhusawal Court) जामीन देताना गुन्ह्याचा तपास पुर्ण होईपर्यंत गावात येवू नये या अटीवर जामीन दिला मात्र ते आदेशाचे उल्लंघण करून शहरात आल्याची माहिती बाजारपेठ पोलिसांना (Bhusawal Bazarpet Police Station) मिळाल्यानंतर पोलिसांनी खातरजमा केल्यानंतर त्यांच्याविरोधात शनिवारी कॉन्स्टेबल सुनील साळुंखे यांच्या फिर्यादीनुसार भादंवि 188 गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलिस निरीक्षक दिलीप भागवत (PI Dilip Bhagwat), सहा.निरीक्षक मंगेश गोंटला (Api Mangesh Gontla) यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.


