खिर्डीसह परीसरात अवैध गुटखा विक्री जोमात

पोलिस व अन्न व औषध प्रशासनाचे दुर्लक्ष : नागरीकांमध्ये आश्चर्य


खिर्डी : राज्यात गुटखा व पानमसाला विक्रीस बंदी घालण्यात आली असलीतरी या परीसरात मात्र सर्रासपणे काही किराणा दुकानांसह पानटपरीमात्र सहजपणे त्याची उपलब्धता होत असल्याने नागरीकांमध्ये आश्चर्य व संताप व्यक्त होत आहे. व्यसनाच्या आहारी युवावर्ग जात असल्याने पालकवर्गातून चिंता व्यक्त हेात आहे. कारवाईची जवाबदारी असलेली यंत्रणा हातावर हात ठेवून असल्याचा आरोप होताना दिसत आहे.

सहज उपलब्ध होतोय गुटखा व पानमसाला
राज्यात पान मसाला, गुटखा विक्रीस बंदी असली तरी रावेर तालुक्यातील खिर्डीसह परीसरात खुलेआमपणे मात्र त्याची सहज उपलब्धता होत आहे. आजूबाजूच्या गावासह किराणा दुकानांमध्ये देखील गुटखा अगदी सहजपणे विक्री होताना दिसत आहे. राज्यात 2012 पासून गुटखाबंदी असतानाही ‘अन्न सुरक्षा मानदे कायदा’ पायदळी तुडवीत खिर्डीत अवैधरीत्या गुटखा, पानमसाला व सुगंधित तंबाखूची राजरोसपणे सर्रास विक्री कायम आहे. पोलिस व अन्न व औषध प्रशासनाकडून कारवाई होत नसल्याने विक्रेत्यांचे फावले आहे. गुटखा बंदी ही केवळ नावापुरतीच उरलेली आहे का? असा प्रश्न सुध्दा नागरीकांना पडत आहे. या परीसरात धडक कारवाई मोहिम राबवण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !