बोदवड नगरपंचायतीत या उमेदवारांनी मिळवला विजय : बातमी जाणून घ्या एका क्लिकवर
बोदवड : बोदवड नगरपंचायतीच्या (Bodwad Nagarpachayat) 17 जागांसाठी झालेल्या अत्यंत चुरशीच्या निवडणुकीत शिवसेनेने तब्बल नऊ जागा पटकावल्या असून राष्ट्रवादीला सात तर भाजपाला अवघ्या एका जागेवर (तेही ईश्वरचिठ्ठीतून) समाधान मानावे लागले आहे. माजी मंत्री एकनाथराव खडसे व आमदार चंद्रकांत पाटील यांच्यासाठी अत्यंत प्रतिष्ठेची ठरलेल्या व उभ्या महाराष्ट्राचे लक्ष लागलेल्या या निवडणुकीत माजी मंत्री खडसेंना आमदार पाटील यांनी या निवडणुकीत धक्का दिला आहे तर माजी मंत्री गिरीश महाजन यांनादेखील मतदारांनी नाकारल्याचे वास्तव चित्र निवडणुकीतून दिसून आले असून भाजपाला (bjp) केवळ एकाच जागेवर समाधान मानावे लागले आहे.
नेत्यांची प्रतिष्ठा लागली होती पणाला
बोदवड येथील नगरपंचायत निवडणुकीत (Bodwad Nagarpachayat) शिवसेनेचे आमदार चंद्रकांत पाटील (sema mla chandrakant patil) तसेच राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री आमदार एकनाथराव खडसे (ex mla eknathrav khadse) तसेच भाजपाचे माजी मंत्री गिरीश महाजन या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. बोदवड नगरपंचायतीतील निकालाचा आगामी राजकीय समीकरणांवर परीणाम होणार असल्याने नेत्यांसाठी ही निवडणूक अतिशय प्रतिष्ठेची मानली जात होती मात्र आमदार चंद्रकांत पाटील यांची रणनीती त्यात यशस्वी ठरली आहे. निवडणुकीच्या दोन दिवस आधी माजी मंत्री गिरीश महाजन (bjp leader girish mahajan) व आमदार चंद्रकांत पाटील (sema mla chandrakant patil) यांच्यातील गुप्तगूनेही मोठी खळबळ या निवडणुकीत उडवून दिली होती.

प्रभागनिहाय विजयी उमेदवार व मिळालेली मते अशी-
प्रभाग एक- रेखा संजय गायकवाड (शिवसेना, 466)
प्रभाग दोन- कडूसिंग पांडुरंग पाटील (राष्ट्रवादी, 367)
प्रभाग तीन- योगीता गोपाळ खेवलकर (राष्ट्रवादी, 405)
प्रभाग चार- सईदाबी सैय्यद रशीद बागवान (राष्ट्रवादी, 551)
प्रभाग पाच- विजय शिवराम बडगुजर (भाजपा, 374) ईश्वरचिठ्ठीने
प्रभाग सहा- पूजा प्रितेश जैन (शिवसेना, 302)
प्रभाग सात- पूजा संदीप पारधी (राष्ट्रवादी, 244)
प्रभाग आठ- एकता बी.लतीफोद्दीन शेख (431, राष्ट्रवादी)
प्रभाग नऊ- आनंदा रामदास पाटील (506, शिवसेना)
प्रभाग दहा- मनीषा कैलास बडगुजर (380, शिवसेना)
प्रभाग अकरा- बेबीबाई रमेश चव्हाण (439, शिवसेना)
प्रभाग बारा- शारदा सुनील बोरसे (557, शिवसेना)
प्रभाग तेरा- सईद इब्राहीम बागवान (567, शिवसेना)
प्रभाग चौदा- शेख जफर अल्ताफ (402, राष्ट्रवादी)
प्रभाग पंधरा- शाह मुजम्मील शाह मुजफ्फर शाह (662, राष्ट्रवादी)
प्रभाग सोळा- बेबीबाई विनोद माळी (473, शिवसेना)
प्रभाग सतरा- मीरा दिनेश माळी (816, शिवसेना)
ईश्वरचिठ्ठीतून भाजपा उमेदवार विजयी
प्रभाग क्रमांक पाचमधील भाजपाचे उमेदवार विजय शिवराम बडगुजर अव राष्ट्रवादीचे उमेदवार गोपाल बाबुराव गंगतीरे यांना समान 374 मते मिळाली. त्यामुळे ईश्वर चिठ्ठी काढण्याचा निर्णय झाला. त्यात भाजपचे उमेदवार विजय शिवराम बडगुजर यांच्या गळ्यात विजयी माळ पडली.






