साक्री नगरपंचायतीवर भाजपाचे निर्विवाद वर्चस्व

17 पैकी 11 जागांवर भाजपा उमेदवारांचा विजय तर शिवसेनेचा चार तर अपक्षांसह काँग्रेसला अवघ्या एका जागेवर समाधान


साक्री : अत्यंत चुरशीच्या झालेल्या साक्री नगरपंचायतीच्या निवडणुकीत 17 पैकी 11 जागांवर भाजपाने निर्विवाद वर्चस्व मिळवले तर प्रतिस्पर्धी शिवसेनेला चार तर काँग्रेसला एक तर अपक्ष एक उमेदवार निवडून आला आहे. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसला मात्र मतदारांनी नाकारल्याने एकही उमेदवार विजयी होवू शकला नाही.

काँग्रेसच्या अस्तित्वाला भाजपाने लावला सुरू
धुळे जिल्ह्यातील साक्री नगरपंचायतीसाठी चुरशीच्या झालेल्या निवडणुकीत बुधवारी हाती आलेल्या निकालात 11 जागांवर भाजपाने यश मिळवत काँग्रेसच्या अस्तित्वालाच सुरूंग लावला. साक्री नगरपंचायतीवर आतापर्यंत अनेक वर्षांपासून काँग्रेसचे वर्चस्व होते परंतु यावेळी भाजपने मुसंडी मारत नगरपंचायतीवर भाजपाचा झेंडा फडकावला आहे.


पक्ष निहाय बलाबल असेे

भाजप 11

शिवसेना 4

काँग्रेस 1

अपक्ष 1

राष्ट्रवादी 0

 









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !