मोठी बातमी : अरुणाचलमध्ये हिमस्खलनात सात जवान बेपत्ता
नवी दिल्ली : अरुणाचलमधील कामेंग सेक्टरमधील पर्वतरांगामध्ये (Arunachal Pradesh Avalanche) मोठी हिमस्खलनाची घटना घडली आहे. यामध्ये सात जवान बेपत्ता झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे.
बेपत्ता जवानांचा शोध
अधिकृत सूत्रांनी दिल्लीमध्ये सांगितले की, या बेपत्ता जवानांचा शोध आणि मदतकार्य सुरू आहे. हिमस्खलनाची ही घटना कामेंग सेक्टरमधील पर्वतरांगामध्ये घडली. रविवारी जवानांचे गस्ती पथक या भागात गस्तीसाठी निघाले होते. तेव्हाच हिमस्खलन झाल्याने हे जवान त्यामध्ये अडकले आहेत.




खराब हवामानामुळे बर्फवृष्टी
सुत्रांनी सांगितले की, जवानांचा शोध सुरु आहे. त्यांना वाचविण्यासाठी विशेषज्ञांची टीमला विमानाने घटनास्थळी पाठविण्यात आले आहे. खराब हवामानामुळे गेल्या काही दिवसांपासून तिथे सतत बर्फवृष्टी होत आहे. यामुळे बचावकार्यातही अडथळे येत आहेत.