काँग्रेस एक क्षणही मोदींशिवाय राहू शकत : लोकसभेत पंतप्रधानांची काँग्रेसवर चौफेर टिका


नवी दिल्ली : काँग्रेस एक क्षणही मोदींशिवाय राहू शकत नाही, असे म्हणत लोकसभेत आज पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काँग्रेसच्या पराभवांचे वाभाडे काढले आहेत. जे इतिहासातून काही बोध घेत नाहीत, ते इतिहासातच हरवून जातात, असं म्हणत मोदींनी काँग्रेसवर निशाणा साधला. इतक्या वर्षांपर्यंत निवडणुकीत पराभव झाल्यानंतरही अहंकारात बदल झाला नाही. इतकी वर्षे देशावर राज्य करणारे आणि मोठ्या महालात राहणारे छोट्या शेतकर्‍यांबाबत बोलणं विसरुन गेले. भारताच्या प्रगतीसाठी छोट्या शेतकर्‍यांना सक्षम करणं आवश्यक आहे. छोटा शेतकरीही भारताची प्रगती अजून मजबूत करेल, असेही मोदी यावेळी म्हणाले.

तर तुम्हाला गरीबांच्या समस्या दिसल्या असत्या !
यावेळी त्यांनी कोणाचंही नाव न घेता ’मेक इन इंडिया’चा विरोध करणार्‍यांवर निशाणा साधला. मेक इन इंडियाची खिल्ली उडवली गेली. परंतु याची खिल्ली उडवणार्‍यांचीच लोकांनी मजा केली. जर तुमचे पाय जमिनीवर असते तर तुम्हाला गरीबांच्या समस्या दिसल्या असत्या. परंतु महात्मा गांधींचं स्वप्न पूर्ण होताना तुम्हाला पाहायचं नाही. तुम्ही योगाची खिल्ली उडवली आणि विरोध केला, असे म्हणत त्यांनी काँग्रेसवर निशाणा साधला.






मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !