मुलीला स्वाधीन न केल्यास माथेफिरू प्रियकराची अॅसीड फेकण्याची धमकी
पानिपत : माझं तुझ्या मुलीवर प्रेम आहे, तिला माझ्या स्वाधीन कर नाहीतर अॅसीड फेकेल, अशी धमकी देणार्या मजनुविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. हरीयाणातील पानिपतमध्ये एका माथेफिरू प्रियकराने हे भयंकर कृत्य करण्याचा कट रचला. यूपीहून अॅसीड घेऊन माथेफिरू पानिपतला पोहोचला होता. जिथे त्याने आवडणारी मुलगी आणि कंपनीतून काम करून घरी परतणार्या तिच्या आईचा मार्ग अडवला. यानंतर त्याने मुलीचा हात पकडला, त्याला मुलीच्या आईने विरोध केला, त्यानंतर दोघांत धक्काबुक्की सुरू झाली. त्याने हातात अॅसीड घेऊन मुलीवर फेकण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, हाणामारी पाहून लोकांच्या जमावाने त्याला पकडले.
पोलिसांनी आरोपीला घेतले ताब्यात
स्थानिक लोकांनी 112 वर कॉल करून पोलीस नियंत्रण कक्षाला माहिती दिली. माहिती मिळताच पोलिसांनी धाव घेत आरोपीला ताब्यात घेतले. त्यानंतर किशनपुरा आणि चांदनीबाग पोलिस स्टेशनही पोहोचले आणि मुलीच्या जबाबाच्याआधारे आरोपी योगेश (सीतापूर) विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला आज न्यायालयात हजर करून पोलीस पुढील कारवाई करणार आहेत.




दोन वर्षांपूर्वीही या मुलीला घेऊन गेले होते
माहितीनुसार, पोलीस तपासात उघड झाले आहे की, ऑक्टोबर 2020 मध्ये पीडित मुलगी 18 वर्षांची असताना ती संशयास्पदरित्या घरातून बेपत्ता झाली होती. चार दिवसांनी मुलगी कानपूरमध्ये सापडली. पोलिस चौकशीत पीडितेने सांगितले की, योगेश तिला आमिष दाखवून सोबत घेऊन गेला होता. यानंतर तरुणीचा योगेशशी संपर्क तुटला होता. पण मुलाने हार मानली नाही. योगेशने गेल्या अनेक महिन्यांपासून तरुणीवर अॅसीड फेकण्याची, भावांना जीवे मारण्याची तसेच इतर धमक्या दिल्याचा आरोप आहे. अॅसिड हल्ला करण्याच्या उद्देशाने आरोपी शुक्रवारी सायंकाळी तरुणीसमोर आला होता.