आप पक्षाच्या लाचखोर नगरसेविका सीबीआय जाळ्यात
नवी दिल्ली : 20 हजारांची लाच घेतल्याप्रकरणी आपच्या नगरसेविकेला (corporator) सीबीआयने (cbi) अटक केल्याने राजधानीत (Dilli) खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे शेंगा विकणार्या व्यक्तीकडून हा पैसा नगरसेविका गीता रावत (corporator gita rawat) यांच्याकडे पोहोचविण्यात आला. दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया (Manish sisodiya) यांच्या विधानसभाक्षेत्र पटपडगंज येथील विनोद नगर वार्डातून गीता रावत यांना अटक करण्यात आली आहे.
राजधानी तापली
नगरसेविका गीता रावत (corporator gita rawat) यांच्या अटकेनंतर राजधानी दिल्लीतील राजकारण चांगलंच तापलं आहे. रावत यांनी आपल्या घरावर छत टाकण्यासाठी अवैधपणे ही लाच घेतली होती. मिळालेल्या माहितीनुसार, आपल्या मुलास अटक झाल्याचे शेंगा विक्रेते सनाउल्लाह यांना समजताच त्यांनी तात्काळ घटनास्थळ गाठले तसेच मुलाला अटक करण्याचे कारणही विचारले. त्यावेळ सीबीआयने त्यांची ओळख सांगून काही वेळातच तुम्हाला समजेल, असं उत्तर दिलं. सीबीआयने संपूर्ण घटनेचा खुलासा केला.




विक्रेत्याकडे मागितली लाच
नगरसेविका गीता रावत (corporator gita rawat) या शेंगा विक्रेत्याद्वारे लाच घेत होत्या. सीबीआयने माहिती घेतल्यानंतर या नोटाला रंग लावून शेंगा विक्रेत्याकडे पैसे दिले होते. तेच पैसे गीता रावत यांना देत असताना शेंगा विक्रेत्यासह गीता रावत या दोघांनाही सीबीआयने अटक केली. सीबीआयच्या पथकाने संबंधित नोटा जप्त करुन दोघांनाही सोबत नेले आहे.
भाजपाकडून केजरीवाल ट्रोल
या घटनेनंतर भाजपने आम आदमी पक्षावर निशाणा साधला आहे. दिल्ली भाजपच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन, केजरीवाल जी आप की यह कैसी ईमानदारी, रिश्वत लेते हो रही आपके नेताओं की गिरफ़्तारी? असे खोचक ट्विट केलं आहे. तर, आता कुठलं नवीन कारण देणार आपण? असा प्रश्नही उपस्थित केला आहे.
केजरीवाल जी "आप" की यह कैसी ईमानदारी, रिश्वत लेते हो रही आपके नेताओं की गिरफ़्तारी?
अब क्या नया बहाना बनाएंगे आप? pic.twitter.com/LkHq9i36NX— BJP Delhi (@BJP4Delhi) February 18, 2022