धक्कादायक ! : लग्न होताच विवाहितेचे अश्लील फोटो व्हायरल
नवी दिल्ली : लग्न झालेल्या विवाहित तरुणीचे अश्लील फोटो व्हायरल झाल्यानंतर तरुणीचा विवाह मोडला असून या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर आरोपीला अटक करण्यात आली. बिहारच्या जमुई जिल्ह्यात ही घटना घडली. दरम्यान, यापूर्वी दोनदा मुलीचे लग्न मोडले असल्याचे सांगण्यात येत आहे. ही घटना घडवून आणणार्या व्यक्तीला पोलिसांनी अटक केली आहे.
आरोपीला पोलिसांकडून अटक
पीडितेचे लग्न नवादा जिल्ह्यातील एका मुलासोबत निश्चित झाले होते. तेव्हापासून तरुणीचे अश्लील फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागले. पोलिस ठाण्यात तक्रारीनंतर जमुई पोलिस आणि सायबर सेलने याप्रकरणी तपास सुरू केला, तेव्हा आरोपीचे नाव रोहित चौधरी असल्याचे समोर आले, त्याला नवादा येथून अटक करण्यात आली.




फेक फेसबुक आयडी बनवून फोटो शेअर केला
या प्रकरणावर डीएसपी राकेश कुमार यांनी सांगितले की, नवविवाहित जोडप्याचे काही फोटो मॉर्फ केले गेले आणि एडिट केले गेले. नंतर सोशल मीडियावर व्हायरल केले. याप्रकरणी रोहित चौधरी नावाच्या आरोपीला अटक करण्यात आली. आरोपीला तरुणीचे लग्न मोडायचे होते. एवढेच नाही तर पीडितेच्या नावाने फेक फेसबुक आयडी बनवून तो सतत फोटो शेअर करत होता. दरम्यान, आरोपी रोहित चौधरीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यास अटक करण्यात आली.