सुरक्षा दल व दहशतवाद्यांमध्ये जम्मू काश्मिरात चकमक : दोन जवान शहिद
जम्मू काश्मीर : घरात दहशतवादी लपले असल्याची माहिती लपवल्यानंतर दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात दोन जवान शहिद झाले. ही घटना जम्मू-कश्मीरमध्ये शोपियान भागात घडली. संतोष यादव आणि रोमित तानाजी अशी दोन शहिद झालेल्या जवानांची नावे आहेत. रोमीत तानाजी चव्हाण (23, शिगाव, ता.वाळवा, जि.सांगली) व संतोष यादव अशी शहिद झालेल्या जवानांची नावे आहे तर एका दहशतवाद्याला कंठस्नान घालण्यात यंत्रणेला यश आले आहे.
सर्च ऑपरेशनदरम्यान गोळीबार
काश्मिर झोनचे पोलिस महानिरीक्षक विजय कुमार म्हणाले, पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार 18 आणि 19 फेब्रुवारीला मध्यरात्री सुरक्षादल आणि पोलिसांनी चेरमार्ग, शोपियान येथे एक संयुक्त अभियान सुरू केले होते. त्यानंतर त्यांनी त्या भागाला घेराव घालत सर्च ऑपरेशन सुरू केलं आणि नागरीकांना बाहेर काढण्यात आले. पुढे ते म्हणाले, सर्च ऑपरेशन दरम्यान जेव्हा सुरक्षा दल गौहर अहमद भट यांच्या घरी पोहचले. तेव्हा घर मालकाने तपास यंत्रणेला खोटी माहिती दिली. घरात दहशतवादी असल्याची माहिती लपवली. जेव्हा सुरक्षादल चौकशी करत होते, त्यावेळी घरात लपलेल्या दहशतवाद्यांनी सुरक्षा दलावर गोळीबार केला. या गोळीबारात दोन जवान गंभीर जखमी झाले. सुरक्षा दलांनी प्रत्युत्तरात केलेल्या गोळीबारा लष्कर ए तोयबाचा एका दहशतवाद्याला कंठस्नान घातले. कारावाईनंतर एक एके रायफल आणि एक बंदुकीसह दारूगोळा जप्त करण्यात आला.




महाराष्ट्रातील जवान शहिद
जम्मू- काश्मिरमधील शोपियांमध्ये झालेल्या चकमकीत शहिद झालेला जवान सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील शिगाव गावचे सुपुत्र आहे. रोमित तानाजी चव्हाण (23) असे शहिद जवानाचे नाव आहे. पाच वर्षापूर्वी रोमित हा मुंबई येथे सैन्य दलात भरती झाला. त्यानंतर मध्यप्रदेश येथील सागर येथे महार रेजिमेंटल सेंटरवर त्यांचे एक वर्ष ट्रेंनिग झाले होते. चार महार येथून त्याच्या सेवेला सुरूवात झाली होती. एक वर्षा पूर्वी जम्मू काश्मीर येथे 1 राष्ट्रीय रायफलमध्ये पोस्टिंग झाले. जम्मू काश्मीर येथील शोपिया भागात दहशतवादी लपून बसल्याची माहिती भारतीय सैन्याला समजताच या भागात घेराबंदी करून सर्च ऑपरेशन राबवण्यात आले. यावेळी लपून बसलेल्या दहशतवाद्यांनी जवानांवर गोळीबार सुरू केला यामध्ये शिगाव येथील रोमित चव्हाण आणि उत्तर प्रदेश येथील संतोष यादव हे जवान शहीद झाले.