अल्पवयीन मुलीवर वाढदिवशीच सामूहिक अत्याचार


बंगळुरू : राज्यातील अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराच्या घटना थांबलेल्या नाहीत. वाढदिवशीच अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार झाल्याची घटना समोर आल्याने खळबळ उडाली आहे. कर्नाटकातील कोलार जिल्ह्यातील कामसमुद्र पोलीस स्टेशन परीसरात ही घटना घडली. या प्रकरणी चार आरोपींना अटक करण्यात आल्याचे पोलिसांनी रविवारी सांगितले. आनंद कुमार, कंथाराजू, प्रवीण आणि वेणू अशी आरोपींची नावे आहेत. तीन गवंडी आणि एक बस चालक आहे.

एकटे पाहून साधली संधी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नववीत शिकणारी मुलगी तिच्या वाढदिवसानिमित्त नवीन कपडे आणि चॉकलेट्स खरेदी न केल्याने तिच्या पालकांवर रागावली होती. त्यामुळे ती शुक्रवारी शाळेत न जाता बंगरापेटला जाण्यासाठी बसमध्ये चढली. तिला एकटे पाहून बदमाशांनी तिच्याशी बोलून एका उद्यानात नेले आणि सायंकाळपर्यंत तेथेच ठेवले. सायंकाळी उशिरा आरोपीने तिला खासगी बसने तनिमदगू या गावी नेले. वाटेत एका निर्जनस्थळी आरोपींनी दारू पिऊन तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. मुलीचा आरडाओरडा ऐकून गावकऱ्यांनी कळसमुद्रा पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून आरोपीला ताब्यात घेतले. मुलीवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिसांनी पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे.






मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !