रशिया आक्रमक : घुसखोरीच्या प्रयत्नात युक्रेनच्या पाच सैनिकांना केले ठार
मॉस्को : रशियाच्या सीमेवर शिरण्याच्या प्रयत्नातील पाच सैनिकांना प्रत्युत्तरादाखल रशियन सैन्याने केलेल्या गोळीबारात पाचही सैनिक मारले गेल्याचा दावा रशियाने केला आहे.युक्रेनकडून रशियन सीमेवर गोळीबार होत असल्याचा आरोपही रशियाने केला आहे. दरम्यान, रशिया आणि युक्रेनमध्ये जवळापास युद्धाला सुरुवात झाल्याची चिन्हे दिसू लागल्याने चिंता व्यक्त होत आहे.
दोन लष्करी वाहनेही उडवली
याचबरोबर रशियाने युक्रेनची दोन लष्करी वाहने उडवून दिल्याचा दावा केला आहे. ही वाहने सीमेवर घुसखोरी करत असल्याचा आरोप केला आहे. रशियाच्या साउदर्न मिलिट्री डिस्ट्रिक्टने घेतलेल्या पत्रकार परिषदेत हा दावा करण्यात आला आहे. रशियन सैनिक आणि एफएसबी बॉर्डर गार्डस यांनी पाच युक्रेनी सैनिकांना मारले आहे.




रशियावर गोळीबार केलेला नाही
रशियाच्या या आरोपांनंतर युक्रेनने या घटनेचे खंडन केले आहे. युक्रेनने असे काहीही केलेले नाही. युक्रेनच्या परराष्ट्र मंत्र्यांनी ट्विट करून हे प्रत्यूत्तर दिले आहे. दिमित्रो कुलेबा यांनी म्हटले की, डोनेट्स्क आणि लुहान्स्कीवर हल्ला केलेला नाही. रशियावर गोळीबार केलेला नाही. तसेच कोणत्याही विद्रोहींना सीमापारही पाठविलेले नाही, असे म्हटले आहे.