अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार करीत केली हत्या


दिल्ली : राजधानी दिल्लीत सामूहिक (delhi gang rape) अत्याचार झाल्याची घटना समोर आल्याने खळबळ उडाली आहे. दिल्लीतील नरेला नराधमांनी 14 वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार (gang rape)करीत नंतर तिची गळा आवळून हत्या केली. नराधमांनी दुकानात मृतदेह बंद करून शटर बंद केले.

आठवडाभरापासून मुलगी बेपत्ता
दिल्लीतील नरेला येथे एका बंद दुकानात 14 वर्षीय अल्पवयीन मुलीचा मृतदेह सापडला आहे. ही मुलगी गेल्या आठवडाभरापासून बेपत्ता होती. नातेवाइकांनी खूप शोध घेतला, मात्र मुलगी कुठेच सापडली नाही. त्यांनी बेपत्ता व्यक्तीबाबत हरवल्याची तक्रार दाखल करण्यात आली. यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला.





विकृत अवस्थेत मृतदेह सापडला
वास्तविक, मुलगी आठवडाभरापूर्वी जवळच्या दुकानात सामान घेण्यासाठी गेली होती. तेव्हापासून ती बेपत्ता होती. 19 फेब्रुवारी रोजी एका दुकानातून दुर्गंधी येत होती. त्यानंतर आजूबाजूच्या लोकांनी याची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून दुकानाचे शटर तोडले असता वास्तव समोर आले. दुकानात मुलीचा मृतदेह छिन्नविछिन्न अवस्थेत पडलेला होता.पोलिसांनी या प्रकरणाचा सखोल तपास केला, त्यानंतर घटना घडवणारा एक आरोपी पोलिसांच्या हाती लागले. तर दुसरा आरोपी फरार आहे. अटक आरोपी सचिनने सांगितले की, घटनेच्या दिवशी त्याने मुलीला भेटायला बोलावले होते. यादरम्यान दोघांनी बलात्कार केला. दुसरा आरोपी सुनील फरार आहे.

आरोपी हरदोई येथील रहिवासी आहेत
एवढेच नाही तर मुलीचा गळा आवळून खून केला. मृतदेह दुकानात टाकून त्यांनी शटर बंद करून पळ काढला. दोन्ही आरोपी मुलीचे ओळखीचे असून ते हरदोई येथील रहिवासी असल्याचे पोलिसांनी सांगितले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !