पोलिस पत्नीचे तहसीलदारांसोबत जुळले प्रेम मात्र नंतरची घटना धक्कादायक !


लखनौ : सोशल मिडीयावरून पाच वर्षांपूर्वी नायब तहसीलदाराशी ओळख झाली नंतर ते दोघे प्रेमात पडले मात्र दरम्यानच्या काळात कॉन्स्टेबल तरुणीचा पोलिसाशी विवाह झाला मात्र प्रेम बहरत राहिले. या दरम्यानच्या काळात पोलिस पतीने पत्नीला घटस्फोट दिला व पुन्हा प्रेयसीच्या प्रियकरावर लग्नासाठी दबाव वाढला मात्र या प्रकाराला कंटाळून प्रियकर नायब तहसीलदाराने मित्राच्या मदतीने प्रेयसीची हत्या केली. रुची सिंह असे हत्या झालेल्या महिलेचे नाव असून पोलिसांनी या गुन्ह्याचा उलगडा केला आहे.

लग्नासाठी नायब तहसीलदारावर वाढला दबाव
या प्रकरणी डीसीपी अमित आनंद म्हणाले की, महिला पोलिसाच्या डोक्यात जड वस्तूने प्रहार केला होता. पाच वर्षापूर्वी तिची नायब तहसीलादारासोबत फेसबुकवरुन ओळख झाली. त्यानंतर दोघे जवळ आले. महिला पोलिसाने तिच्या पतीसोबत घटस्फोट घेतला होता. त्यानंतर तिने तहसीलदारावर लग्नासाठी दबाव टाकण्यास सुरुवात केली त्यामुळे त्रस्त झालेल्या तहसीलदारानेच हे षडयंत्र रचलं. त्याने रुचीला फोन करुन पीजीआय हॉस्पिटलला बोलावले. तेथे मित्राच्या मदतीनं तिला नशेचं औषध देत बेशुद्ध करण्यात आले. त्यानंतर आरोपीने गळा दाबून तिची हत्या केली आणि मृतदेह जवळील नाल्यात फेकला.





तिघा आरोपींना केली अटक
पोलीस मुख्यालयात तैनात असलेल्या रुची सिंह महिलेच्या हत्या प्रकरणी नायब तहसीलदार पद्मेश श्रीवास्तव, त्याची पत्नी आणि आणखी एका मित्राला अटक करण्यात आली. कालिमाता परिसरातील नाल्यात रुची सिंहचा बेवारस अवस्थेत मृतदेह सापडला होता. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा नोंदवत तपास सुरु केला.

प्रेमासाठी घेतला पतीपासून घटस्फोट
रुचीचे लग्न जून 2019 मध्ये कॉन्स्टेबल नीरजसोबत झाले होते. डिसेंबर 2019 ला ती पोलीस खात्यात भरती झाली परंतु त्याआधीपासून प्रयागराजचे नायब तहसीलदार पद्मेश श्रीवास्तव याच्याशी तिचे प्रेमसंबंध सुरू झाले. नोकरी मिळाल्यानंतर तिला जुन्या प्रेमाची आठवण झाली. त्यासाठी तिने आधी पती नीरजवर हुंड्यामुळे छळाचा आरोप करत त्याच्याशी घटस्फोट घेतला. काही महिन्यांनी दोघांचा घटस्फोट झाला. त्यानंतर रुचीनं पद्मेशवर लग्नासाठी दबाव टाकला. कुठल्याही परिस्थितीत तिला नायब तहसीलदारासोबत लग्न करायचं होते त्यामुळे दोघांमध्ये सातत्याने वाद होत होते. घटनेच्या काही दिवस आधी रुचीनं पद्मेशला कॉल केला परंतु तो पत्नी प्रगतीनं उचलला. त्यावेळी फोनवरुन त्या दोघींमध्ये वाद झाला. त्यानंतर पद्मेशनं हत्येचं षडयंत्र रचले. महिला शिपायाच्या डोक्यात जड वस्तूने प्रहार केल्याचं पोस्टमोर्टम रीपोर्टमधून समोर आले आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !