Big Breaking मंत्री नवाब मलिक यांना अखेर ईडीकडून अटक : राष्ट्रवादी संतप्त


मुंबई : तब्बल आठ तासांच्या चौकशीनंतर मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक (Maharashtra Minister Nawab Malik) यांना अंमलबजावणी संचलनालयाने (ईडी) नवाब मलिक (Nawab Malik) यांना अटक केल्याने राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळउ डाली आहे. या प्रकारानंतर राज्यातील राष्ट्रवादी पदाधिकारी संतप्त झाले आले असून ठिकठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. मलिक यांना वैद्यकीय तपासणीसाठी जे.जे.रुग्णालयात नेण्यात येत आहे.





हा तर सरळ यंत्रणेचा गैरवापर : शरद पवार
नवाब मलिकांवरील (Nawab Malik) कारवाई हे केंद्रीय यंत्रणेच्या गैरवापराचं उदाहरण असल्याचे शरद पवार (sharad pawar) यांनी म्हणत संताप व्यक्त केला आहे. पवार म्हणाले याबाबत काय बोलायचं? यात काही नवीन नाही. सध्या ज्या प्रकारे यंत्रणेचा गैरवापर केला जात आहे त्याचं हे एक उदाहरण आहे. आम्हाला खात्री होती की आज ना उद्या हे कधीतरी घडेल. नवाब मलिक हे जाहीरपणे बोलतात त्यामुळे काहीतरी प्रकरण काढून त्यांना त्रास दिला जाईल याची आम्हाला खात्री होती. यावर अधिक भाष्य करण्याची गरज नाही.

भल्या पहाटेच ईडीने घेतले ताब्यात
बुधवारी पहाटे साडेचारच्या सुमारास ईडीचे (ed) अधिकारी नवाब मलिक (Nawab Malik) यांच्या निवासस्थानी आले. तेव्हा त्यांच्यासोबत सीआरपीएफचे जवान होते. मलिक यांना कारवाईची कल्पना दिल्यानंतर ईडीच्या अधिकार्‍यांनी सकाळी साडेसात वाजता त्यांना ईडीच्या कार्यालयात आणले. त्यानंतर सकाळी पावणेआठ वाजल्यापासून मलिक (Nawab Malik) यांची चौकशी सुरू होती. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांची अंडरवर्ल्ड कनेक्शन प्रकरणात चौकशी सुरु असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. काही दिवसांपूर्वी याप्रकरणात एनआयए आणि ईडीकडून मुंबईत संयुक्तपणे छापे टाकण्यात आले होते. कुख्यात गुंड दाऊदची दिवंगत बहीण हसीना पारकर हिच्याशी संबंधित मालमत्तांवरही छापे टाकण्यात आले होते. तसेच दाऊदचा भाऊ इकबाल कासकर यालाही ईडीने अटक केली होती. इकबाल कासकरच्या चौकशीत नवाब मलिक यांचे नाव पुढे आल्याचे समजते. त्यामुळे ईडीकडून नवाब मलिक यांची चौकशी होत असल्याचे समजते.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !