याचिका फेटाळली : दहावी-बारावीची परीक्षा ऑफलाईनच होणार !
नवी दिल्ली : दहावी-बारावीच्या परीक्षा ऑफलाईन होणार असून सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) ऑनलाईन परीक्षा (Online Exam) घेण्यासंदर्भातील याचिका फेटाळली आहे. संस्था त्यांचे काम करत असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. अशी याचिका ऐकून घेण्याचे कारण नाही. अशा याचिकांमुळे मुलांमध्ये संभ्रम निर्माण होतो, अशी टिपणी न्यायालयाने नोंदवली.
प्रशासनाला काम करू देणे गरजेचे
सीबीएसई, आयसीएसई, एनआयओएस तसेच सर्व राज्यांच्या बोर्डांनी दहावी–बारावीच्या परीक्षा (exam) ऑफलाईन (offline) पद्धतीने घेण्यासाठीची तयारी केली आहे. या टप्प्यावरून परीक्षा सुरळीत होण्यासाठी संबंधित प्रशासनाला त्यांचे काम करू देणे हे श्रेयस्कर आहे. जर कोणाला परीक्षेच्या तारखांवरून अथवा परीक्षेच्या आयोजनावरून काही तक्रार असेल तर संबंधित प्रशासनाला लेखी स्वरुपात कळविता यईल. विशेष परिस्थितीत अपवाद म्हणून परीक्षा ऑनलाईन घेतली जाऊ शकते. पण कायम ऑनलाईन पद्धतीनेच परीक्षा घ्या ही मागणी करणे तसेच या मागणीला मंजुरी देणे योग्य ठरणार नाही, असे न्यायालयाने म्हटले आहे.



