रशियाच्या हल्ल्यानंतर युक्रेनच्या हल्ल्यात सहा विमानासह एक हेलिकॉप्टर पाडल्याचा दावा


Ukraine-Russia War : न्युज डेस्क : रशियाची सहा विमानं आणि एक हेलिकॉप्टर पाडल्याचा दावा युक्रेननं केला आहे. रशियाने युक्रेनवर हल्ला केल्यानंतर युक्रेननेही रशियाला जशाच तसे उत्तर दिल्याचा दावा केला आहे. युक्रेनमधील लुहान्स प्रांतामध्ये ही विमानं पाडल्याचा दावा युक्रेननं (Ukraine) केलाय. लुहान्स्क हा युक्रेनमधील बंडखोर प्रांतांपैकी एक आहे. याच आठवड्यामध्येच रशियाने (Russia) लुहान्स्कला वेगळा देश म्हणून घोषित केलं आहे.

५० लष्करी जवानांना ठार केल्याचा दावा
रशियन लष्कराने युक्रेनकडून करण्यात आलेला हवाई हल्ला आम्ही हाणून पाडल्याचा दावा केलाय. युक्रेनच्या उत्तरेकडून रशियाने हल्ला केला असून रशियन सैन्य युक्रेनच्या भूप्रदेशात शिरलं आहे. त्याचबरोबरच ब्रुसेल्समधूनही रशियाने युक्रेनवर (Ukraine-Russia War) हल्ला चढवलाय मात्र या हल्ल्याला युक्रेनकडूनही जोरदार उत्तर दिलं जात आहे. युक्रेनच्या लष्कराने Shchastya प्रांत आपल्या ताब्यात आला असून रशियाच्या ५० लष्करी जवानांना ठार केल्याचा दावा केला आहे.






मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !