विवाहित प्रेयसीची प्रियकराने केली हत्या : या शहरातील घटना
कानपूर : सैन्यातील जवानाच्या पत्नीची प्रियकराने हत्या केल्याचा प्रकार उघड झाला आहे. प्रियकराला या प्रकरणी अटक करण्यात आली. कानपूरमधील पनकी रतनपुर कॉलनीतून बेपत्ता झालेल्या सीआरपीएफ जवानाच्या पतीच्या हत्येचा उलगडा करण्यात यंत्रणेला यश आले आहे. कानपूर ग्रामीण भागातील भाऊपूर मैथाजवळील नाल्यात मृतदेह फेकण्यात आला होता. दरम्यान, पोलिसांनी प्रियकराला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने सत्य काबुल केले.
अखेर हत्येचा झाला उलगडा
रतनपूर येथे राहणारे इंदरपाल हे सीआरपीएफमध्ये तैनात आहे. निवडणुकीमुळे त्यांची ड्युटी मैनपुरीत होती. घरी पत्नी गीतादेवी (34) या त्यांच्या सुशांत आणि सिद्धार्थ या दोन मुलांसह राहत होत्या. रविवार, 20 फेब्रुवारी रोजी इंद्रपालने पत्नीच्या मोबाईलवर कॉल केला मात्र तिने फोन उचलला गेला नाही म्हणून त्यांनी काही अनुचित प्रकार घडल्याच्या भीतीने पनकी पोलिसांना घटनेची माहिती दिली. पोलिस त्याच्या घरी पोहोचले तेव्हा ती महिला घरी आढळली नाही. खोलीत रिकामे बिअरचे कॅन, ग्लास आणि काही आक्षेपार्ह वस्तूही आढळून आल्या. सोमवार, 21 फेब्रुवारीला घरी परतलेल्या इंदरपालने पोलिस ठाण्यात हरवल्याची तक्रार दाखल केली.



