युक्रेनमध्ये वैद्यकीय शिक्षणासाठी गेलेले पाच विद्यार्थी भारतात परतले : प्रशासनाला 19 विद्यार्थ्यांची यादी प्राप्त
Russian Ukraine War जळगाव : रशियाने युक्रेनवर हल्ला (Russian Ukraine War) चढवल्यानंतर अराजकता निर्माण झाली आहे. युक्रेनमध्ये सर्वत्र दहशतीचे वातावरण असतानाच भारतातून वैद्यकीय शिक्षणासाठी गेलेले अनेक विद्यार्थी अडकले आहेत. त्यात जळगाव जिल्ह्यातील 19 विद्यार्थी असल्याची अधिकृत माहिती जळगाव जिल्हा प्रशासनाने दिली असून 19 पैकी पाच विद्यार्थी भारतात सुखरले परतले आहेत तर सहा सीमेलगत तसेच सहा सुरक्षित आणि मार्गावर आहेत. दरम्यान, दोघा विद्यार्थ्यांचा मोबाईल बंद असल्याचे सांगण्यात आले.
पाच विद्यार्थी भारतात परतले
जिल्हा प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार निकीत आमले, शोएब राशीद काकर, सुरज शिंदे, देवांग किशोर वाणी, बरीरा युसूफ पटेल हे विद्यार्थी भारतात परतले आहेत. यापैकी काही विद्यार्थी आपल्या स्वगृही देखील पोहचले आहेत.




सहा विद्यार्थी पोलंडसह हंगेरीच्या सीमेलगत
सौरभ विजय पाटील, ओम मनोज कोल्हे, मुस्कान रामशंकर जैस्वाल, श्रद्धा आनंद धोनी, लोकेश विजय निंभोरे, क्षितिजा गजानन सोनवणे हे विद्यार्थी पोलंड सीमेलगत आणि हंगेरीजवळ आहेत. तसेच विजय दिलीप परदेशी, प्रसन्ना संजीव निकम, कल्याणी छगनराव पाटील, रोहन सुनील चव्हाण, यश राजेंद्र परदेशी, शिमा फतेमा शेख अन्सार हे विद्यार्थी सुरक्षित आहे. यश हा होस्टेलच्या भूमिगत बंकरमध्ये आहे.
दोघा विद्यार्थ्यांचा मोबाईल बंद
जिल्ह्यातील निलेश योगराज पाटील, सुमित सुरेशचंद्र वैश्य या दोन विद्यार्थ्यांचे मोबाईल बंद आहेत. त्यामुळे त्यांच्याशी संपर्क होऊ शकलेला नाही. जिल्ह्यातील सर्व विद्यार्थ्यांना सुखरूप घरी आणण्यासाठी प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहेत.