पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते पुण्यात मेट्रोचे उद्घाटन


पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते रविवारी पुणे महापालिकेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण झाले व त्यानंतर पंतप्रधानांच्या हस्ते पुणे मेट्रोचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी मोदींनी गरवारे मेट्रो स्टेशन ते आनंदनगरपर्यंत मेट्रोने प्रवास केला.





विद्यार्थ्यांशी साधला संवाद
यावेळी पंतप्रधानांनी विद्यार्थ्यांना शाळेचे नाव, करीयरमध्ये नेमके काय करणार याबाबत आपुलकीने चौकशी करीत संवादही साधला. पंतप्रधानांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधल्याने विद्यार्थीही भारावल्याचे दिसून आले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !