Sanjay Raut ईडी अधिकार्‍यांकडून होणारी वसुली देशातील आजवरचा सर्वात मोठा घोटाळा : खासदार संजय राऊत यांचा आरोप


Sanjay Raut मुंबई : ईडीच्या अधिकार्‍यांच्या बँक खात्यावर अनेक कंपन्यांकडून कोट्यवधी रुपये ट्रान्सफर झाले असून त्याचे पुरावे सर्वांना देणार असल्याचं राऊत म्हणाले. ईडीच्या अधिकार्‍यांकडून सुरू असलेली वसुली देशातील आजवरचा सर्वात मोठा घोटाळा आहे. जितेंद्र नवलानी यांच्या अकाऊंटवर कोट्यवधी रुपये पाठवले गेले आहेत. अविनाश भोसले यांच्या कंपनीकडून नवलानी यांच्याखात्यावर सुरुवातीला 10 कोटी रुपये आणि जेव्हा भोसले यांच्या कंपन्यांची चौकशी सुरू झाली तेव्हा आणखी 16 कोटी रुपये ट्रान्सफर झाले आहेत. आम्ही आतापर्यंत आयकर आणि ईडीला 50 नावं पाठवली. मात्र हे त्यांच्यावर कारवाई करत नाहीत. मी एक खासदार असूनही तक्रारींची दखल घेतली जात नाही. संपूर्ण देशात फक्त महाराष्ट्रातच सर्वाधिक धाडी का?, असा सवाल उपस्थित करत संजय राऊत (MP Sanjay Raut) यांनी भाजपावरही पत्रकार परीषदेत जोरदार हल्ला चढवला.

अट्टल दुचाकी चोरट्याकडून सात चोरीच्या दुचाकी जप्त : जिल्ह्यातील या तालुक्यात कारवाई

दुध विक्रेता आठ हजार कोटींचा मालक कसा ?
बुलंद शहरातील या दूध विकणार्‍या सामान्य माणासाची प्रॉपर्टी चार पाच वर्षात आठ हजार कोटींची कशी झाली?, असा प्रश्न खासदार संजय राऊत यांनी उपस्थित करत यामागे भाजपा नेत्यांचा हात असल्याचा गौप्यस्फोट केला आहे. शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी मंगळवारी शिवसेना भवनात पत्रकार परिषद घेऊन सक्तवसुली संचालनालय (ED) आणि भाजपावर (BJP) गंभीर आरोप केले. संजय राऊत यांनी यावेळी सुमित कुमार नरवर या दूधवाल्याचा उल्लेख केला. राऊतांनी या आधीच्या पत्रकार परिषदेतही याच दूधवाल्याचा उल्लेख केला होता.





लवकरच करणार गौप्यस्फोट उघड
सुमीत कुमार नरवर याआधी नोएडामध्ये राहत होता. आता तो मलबार हिलमध्ये राहतो. त्याला राहायला साधं घरही नव्हतं. मग ईडीनं नेमका कोणता चष्मा लावला आहे. जर आमच्याकडेही त्याच चष्म्यातून पाहा. मी तुम्हाला त्यांच्या विरोधातील सर्व पुरावे देतो. दिल्ली आणि महाराष्ट्रातील कोणत्या नेत्यांचा पैसा त्याच्याकडे आहे ही माहिती तुम्हाला देतो. माझ्याकडे सर्व रेकॉर्ड आहे. पैसा कुणाचा आहे? त्याला कशी कामं मिळत होती. माझ्याकडे सर्व माहिती आहे. ही भानामती सांगणार आहे. लवकरच याबाबतचा मोठा गौप्यस्फोट मी करणार आहे, असं संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले.

घोटाळे जनतेसमोर आणल्याशिवाय राहणार नाही : राऊत (Sanjay Raut)
ईडीचे अधिकारी कसं वसुली एजंट प्रमाणं काम करत आहेत याची सर्व माहिती माझ्याकडे आहे. ही सर्व भानामती लवकरच सांगणार आहे. त्यानंतर आमच्यावरही धाडी पडतील. आम्हालाही तुम्ही अटक करा. पण तुमचे घोटाळे जनतेसमोर आल्याशिवाय राहणार नाही, असं थेट आव्हान संजय राऊत (Sanjay Raut) यांनी यावेळी दिलं.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !