माजी मंत्री गिरीश महाजनांसह आपल्याला संपवण्याचा डाव : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस


Devendra Fadnavis मुंबई : माजी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन (Bjp leader Girish Mahajan) यांच्यासह मला (Devendra Fadnavis) संपवण्याचा डाव रचण्यात आला असून विरोधकांवर खोट्या तक्रारी नोंदवून त्यांना अडकवण्याचा कटही या सरकारने रचला आहे आणि याचे सर्व पुरावे आपल्याकडे आहेत, असा गंभीर आरोप विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी विधानसभेत बोलताना केल्याने राज्यात मोठी खळबळ उडाली आहे. यावेळी त्यांनी अध्यक्षांकडे एक पेन ड्राइव्ह सोपवला असून या पेनड्राइव्हमध्ये विविध संभाषणे आणि पुरावे दडले असल्याचा मोठा दावाही फडणवीस यांनी केला. ते विधानसभेत कायदा आणि सुव्यवस्थेवर बोलत होते.

पोलिस दलाचा होतोय गैरवापर : फडणवीस (Devendra Fadnavis)
महाविकास आघाडी सरकार हे पोलिस दलाचा गैरवापर करत असून हे प्रकरण अतिशय गंभीर असून या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्यात यावा, अशी मागणीही त्यांनी केली. या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्यात आला नाही, तर आम्ही न्यायालायात जाणार, असेही फडणवीस यांनी जाहीर केले आहे. आम्हाला अडकवण्यासाठी खोटी प्रकरणे तयार करण्यात आली असून खोटे पंच आणि खोटे साक्षीदार उभे करण्यात आले असल्याचे गंभीर आरोपही फडणवीस यांनी केला आहे. माझ्यासह, चंद्रकांत पाटील, रावल आणि गिरीश महाजन यांना फसवण्याचा डावच आखण्यात आल्याचे फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले.





पेन ड्राईव्हमध्ये महत्वाचा डाटा
सरकारवर विरोधकांना संपवण्याचे आणि खोट्या प्रकरणांमध्ये अडकवण्याचा मोठा आरोप केल्यानंतर फडणवीस यांनी विधानसभेच्या अध्यक्षांकडे एक पेन ड्राइव्ह सोपवला. या पेनड्राइव्हमध्ये सव्वाशे तासांचा डेटा असून सगळे पुरावे यात दडले असल्याचे फडणवीस यांनी सांगितले. या व्हिडिओच्या आणि माहितीच्या आधारे 25 ते 30 वेबसिरीजही तयार होऊ शकतील, असेही फडणवीस (Devendra Fadnavis)म्हणाले.

सरकारी वकीलांना धरून कारस्थान : फडणवीस
या पेन ड्राइव्हमध्ये पोलिस अधिकार्‍यांचे संभाषण असून ते अनेक भाजप नेत्यांची नावे घेत असल्याचे दिसत असल्याचे फडणवीस यांनी म्हटले आहे विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांना हाताशी धरूनच सरकार हे कटकारस्थान रचत असल्याचा त्यांचा आरोप आहे. विशेष सरकारी वकील चव्हाण याचे कार्यालय हे कटकारस्थान रचण्याचे मुख्य ठिकाण असल्याचेही ते म्हणाले तर या पेन ड्राइव्हमधील जर काही भाग आपण सादर केला तर सभागृहाची इभ्रत जाईल, असे गंभीर स्वरुपाचे विधानही फडणवीस यांनी केला आहे. सरकार कटकारस्थान कशा प्रकारे शिजवत आहे याचा पुरावा या पेनड्राइव्हमध्ये असल्याचा गौप्यस्फोटही फडणवीस यांनी सभागृहात केला.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !