Maharashtra Budget 2022 अर्थसंकल्पात उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केल्या या मोठ्या घोषणा


Maharashtra Budget 2022 मुंबई : राज्याच्या 2022-23 च्या अर्थसंकल्पात (Maharashtra Budget 2022) नेमक्या काय घोषणा होतात याकडे नागरीकांचे लक्ष लागून असतानाच उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी विधानसभेत अर्थसंकल्प मांडताना अनेक मोठ्या घोषणा केल्या आहेत. इंधन दराच्या बाबतीत दिलासा मिळाला नसलातरी सीएनजीचे दर मात्र कमी होणार आहेत.

800 कोटींची तूट
अर्थमंत्री अजित पवारांनी (Ajit Pawar) नैसर्गिक वायूचा वापर वाढवण्याच्या दृष्टीने घरगुती पाईप गॅस, सीएनजीवर चालणारी वाहने, याचा वापर वाढण्यासाठी पर्यावरण पूरक नैसर्गिक वायूच्या वापरास प्रोत्साहन आणि सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळण्यासाठी मूल्यवर्धित कराचा दर 13.5 टक्क्यावरून तीन टक्के इतका केला आहे. त्यामुळे राज्याच्या तिजोरीत अंदाजे 800 कोटी रुपयांची महसुली घट होणार आहे. अजित पवारांच्या या घोषणेमुळे राज्यात सीएनजी गॅस स्वस्त होणार असून सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.





सोने स्वस्त होणार
सोन्या-चांदीचे दागिने बनवणारे छोटे मोठे उद्योग, रिफायनरी व निर्यातीस चालना देण्यासाठी महाराष्ट्रात आयात होणार्‍या सोने चांदीच्या डिलिव्हरी ऑर्डरच्या दस्तांवर महाराष्ट्र मुद्रांक अधिनियमानुसार आकारण्यात येणार्‍या 0.1 टक्के मुद्रांक शुल्क माफ करण्याची घोषणा अजित पवारांनी (Ajit Pawar) केली आहे. त्यामुळे राज्याला 100 कोटींच्या महसुलीची तूट येण्याची शक्यता आहे.

अजित पवार यांनी परिवहन वाहतूक व्यवस्थेसाठी केलेल्या घोषणा :

  • मुंबई-पुणे समृद्धी महामार्गाचा विस्तार गोंदिया गडचिरोलीपर्यंत करण्यात येणार असल्याची घोषणा अर्थमंत्री अजित पवार यांनी केली आहे. त्यासाठी निधीची तरतूद करण्यात आली आहे.
  • गडचिरोलीत नवीन विमानतळ उभारणार असल्याची महत्त्वाची घोषणा अर्थसंकल्पीय भाषणात अजित पवार यांनी केली.
  • मुंबई शिवडी- न्हावा शेवा सागरी सेतू 2023 च्या अखेरीस सुरू होणार असल्याची महत्त्वाची घोषणा अजित पवार यांनी केली.
  • एसटी महामंडळाला एक हजार नवीन बसेस देणार असल्याचे त्यांनी सांगितले.
  • मुंबई महानगर विकास प्राधिकरण क्षेत्रातील रेल्वे, रस्ते वाहतुकीवरील ताण कमी करण्यासाठी जलवाहतूक विकसित करणार
  • वसई, भाईंदर, डोंबिवली, कल्याण, वाशी, ऐरोली, बेलापूर ही ठिकाणे जलमार्गाशी जोडणार; या ठिकाणच्या जेट्टींच्या विकासासाठी, खाडीची खोली वाढवण्यासाठीच्या कामासाठी 330 कोटींचा खर्च अपेक्षित आहे
  • शिर्डी विमानतळाला 150 कोटींच्या निधीची तरतूद, तर रत्नागिरी विमानतळासाठी 100 कोटींच्या निधीची तरतूद
  • मुंबई ते हैदराबाद बुलेट ट्रेनसाठी केंद्राकडे पाठपुरवठा करणार असल्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी म्हटले.
  • पर्यावरण पूरक तीन हजार बस सुरू करणार असल्याचे अजित पवार यांनी म्हटले.
  • राज्यात ई-वाहनांसाठी 5000 ई-चार्जिंग स्टेशन उभारणार असल्याचे त्यांनी म्हटले. राज्यात इलेक्ट्रीक वाहनांचा भविष्यातील वाढणारा वापर पाहता हा निर्णय महत्त्वाचा ठरणार आहे
  • मुंबई महानगर क्षेत्राला जलमार्गाने जोडण्याचा उद्देश असल्याचे अजित पवार यांनी सांगितले
  • परीवहन विभागाला 3 हजार 303 कोटींचा निधी देण्यात येणार आहे.
  • पुणे रिंग रोडसाठी 1500 कोटींचा निधी प्रस्तावित
  • मुंबई-हैदराबाद दरम्यान बुलेट ट्रेन सुरू करण्याचा प्रस्ताव केंद्राकडे पाठवण्यात येणार असल्याचे अजित पवार यांनी म्हटले.

मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !