Car Accident On Manmad भीषण अपघातात चौघे मित्र जागीच ठार : भरधाव कार झाडावर आदळल्याने अपघात


Car Accident On Manmad मनमाड : येवल्याहून मनमाडकडे निघालेल्या भरधाव वाहनावरील नियंत्रण सुटल्याने कार झाडावर आदळल्याने झालेल्या भीषण अपघातात (Car Accident On Manmad) चौघा मित्रांचा जागीच मृत्यू झाला तर बालिका गंभीर जखमी झाली. येवला रोडवरील अनकवाडे शिवारात हा अपघात घडला. मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास हा अपघात झाला. हा अपघात इतका भीषण होता की कार अक्षरशः चक्काचूर झाली. या अपघातात तौफिक शेख, दिनेश भालेराव, प्रवीण सकट, गोकुळ हिरे चार मित्र जागीच ठार झाले. अजय वानखेडे हा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर मनमाडच्या उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी नाशिकला हलविण्यात आले.

मनमाडकडे परतताना अपघात
पाचही मित्र एका कार्यक्रमासाठी येवला येथे गेले होते तर परतीच्या प्रवासात अनकवाडे येथील फौजी ढाब्यावर जेवायला गेल्यानंतर मनमाडकडे येताना अपघात हा झाला. या अपघातात कार झाडावर आदळल्याने पाच पैकी चौघे जण जागीच (Car Accident On Manmad)  ठार झाले तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. या अपघातामुळे खोळंबलेली वाहतूक सुरळीत करण्यासाठी महामार्ग पोलिसांना वेळ लागला. त्यामुळे दोन्ही बाजूने वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.

अपघातात यांचा जागीच मृत्यू
तौफिक शेख, दिनेश भालेराव, प्रवीण सकट, गोकुळ हिरे या चौघांचा जागीच मृत्यू झाला  (Car Accident On Manmad) तर अजय वानखेडे हा गंभीर जखमी झाला आहे. त्याला मनमाडच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

जिल्हा रुग्णालयात कैद्यांच्या दोन गटात ढिशूम-ढिशूम : चार पोलिसांवर निलंबनाची कुर्‍हाड

पाटलीपूत्र एक्स्प्रेसमधून तीन लाखांचा ऐवज असलेली पर्स चोरट्यांनी लांबवली 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !