चोरीच्या सात दुचाकींसह आठ चोरटे धरणगाव पोलिसांच्या जाळ्यात


धरणगाव : धरणगाव पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे आठ दुचाकी चोरट्यांच्या मुसक्या आवळल्या असून त्यांच्याकडून चोरीच्या सात दुचाकी जप्त केल्या आहेत.

या आरोपींना केली अटक
यश दिनेश सातपुते, तुषार महेंद्र बत्तीसे, वैभव उर्फ विक्की हेमंत चौधरी, मनीष ऊर्फ भुर्‍या योगेश चौधरी, सय्यद पीरन सय्यद मुक्ता, वैभव उर्फ दादू सुरेश मोरे, हसन उर्फ अली मोहम्मद शेख, वसीम शेख बिस्मिल्ला अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.

यांनी केली कारवाई
ही कारवाई धरणगावचे पोलिस निरीक्षक राहुल खताळ यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक जिभाऊ पाटील, पोलिस उपनिरीक्षक अमोल गुंजाळ, गुन्हे शोध पथकातील उमेश पाटील, समाधान भागवत, विनोद संदानशीव, गोपनीय विभागातील वैभव बाविस्कर आदींनी केली.

वाहनधारकांना प्रथमच मोठा दिलासा : इंधनाच्या दरात मोठी कपात : जाणून घ्या नेमके दर










मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !