!-- afp header code starts here -->

वाहनधारकांना मोठा सुखद धक्का : राज्य शासनाने पेट्रोल-डिझेल दरात केली कपात : जाणून घ्या नेमके दर


मुंबई : केंद्र शासनाने शनिवारी पेट्रोल आणि डिझेलचे अबकारी कर कमी केल्यानंतर राज्य शासनाने रविवार, 22 मेपासून पेट्रोल आणि डिझेलवरील मूल्यवर्धित करात अनुक्रमे 2 रुपये 8 पैसे आणि 1 रुपया 44 पैसे प्रती लिटर कपात केली आहे. यामुळे वार्षिक सुमारे 2500 कोटी रुपये राज्याच्या तिजोरीवर भार पडणार आहे.

वाहनधारकांना मोठा दिलासा
मूल्यवर्धित कर कमी केल्याने पेट्रोलकरिता 80 कोटी रुपये महिन्याला आणि 125 कोटी रुपये डिझेलकरिता इतके महसुली उत्पन्न कमी होणार आहे. 16 जून 2020 ते 4 नोव्हेंबर 2021 या कालावधीत केंद्र सरकार पेट्रोल आणि डिझेलवर अनुक्रमे 7 रुपये 69 पैसे आणि 15 रुपये 14 पैसे प्रती लिटर कर आकारत होते. मार्च आणि मे 2020 मध्ये केंद्राने पेट्रोल आणि डिझेलच्या अबकारी दरात अनुक्रमे 13 आणि 16 रुपये अशी वाढ केली होती. रविवारी राज्य सरकारने सर्वसामान्यांना दिलासा देत पेट्रोलच्या मुल्यवर्धित करात (VAT) 2 रुपये 8 पैसे आणि डिझेलवरील करात 1 रुपये 44 पैसे कपात कऱण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे राज्यावर अडीच हजार कोटींचा बोजा पडणार आहे.

वाहन वेग मर्यादेचे फलक नसताना वाहन धारकांची लूट कुणाच्या आदेशाने ? 










मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !