उत्तर काशीत मोठी दुर्घटना : भाविकांची बस दरीत कोसळल्याने 22 ठार
डेहराडून : उत्तराखंडच्या उत्तरकाशी जिल्ह्यात रविवारी भाविकांची बस दरीत कोसळल्याने तब्बल 22 जणांचा मृत्यू झाला असून मृतांचा आकडा वाढण्याची भीती आहे. राष्ट्रीय महामार्गावर हा अपघात डामटाजवळ घडला.
पोलीस आणि एसडीआरएफचं पथक घटनास्थळी मदतकार्य करत असल्याचं त्यांनी सांगितले तर प्राथमिक माहितीनुसार प्रवासी यमुनोत्रीला निघाले होते.
बस 200 मीटर दरीत कोसळली
उत्तरकाशी जिल्ह्यात मध्यप्रदेशातील प्रवाशांना घेऊन जाणारी बस 200 मीटर खोल दरीत कोसळली. उत्तराखंडमधील डामटा ते नौगावमधील रिखाऊं खड्ड जवळी ही घटना घडली. अपघाताची माहिती मिळताच उत्तरकाशी पोलीस आणि एसडीआरएफचं पथक घटनास्थळी पाठवण्यात आलेंआहे. प्राथमिक माहितीनुसार 22 जणांचा मृत्यू झाला तर सहा जण जखमी आहेत तर काही प्रवासी गायब आहेत. उत्तराखंडमधील आमदार दुर्गेश लाल यांनी मृतांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त केलीय.







