भुसावळ विद्युत इंजिन कारखान्यात समस्यांमुळे कर्मचारी संतप्त

द्वारसभेत सीआरएमएस पदाधिकार्‍यांचा रेल्वे प्रशासनाला इशारा


भुसावळ : ईएलडब्ल्यू वर्कशॉपमधील विविध समस्यांमुळे त्रस्त झालेल्या कर्मचार्‍यांच्या वतीने सीआरएमएस पदाधिकार्‍यांनी सोमवारी दुपारी द्वारसभेत तीव्र संताप व्यक्त करीत रेल्वे प्रशासनाला इशारा दिला.

न्याय मागण्यांसाठी कर्मचारी संतप्त
मध्य रेल्वेतील रीक्त पदे भरावीत, खाजगीकरण बंद करावे, रात्रपाळी भत्ता सुरू करावा, कोरोना काळातील 18 महिन्यांचा डीए भारत सरकाने द्यावा, भुसावळातील पीओएच, ईएलडब्ल्यू वर्कशॉपमध्ये कर्मचार्‍यांना सोयी-सुविधा मिळाव्यात, वर्कशॉपमध्ये कर्मचार्‍यांना मिळणार्‍या नास्त्याच्या दर्जात सुधारणा करावी, वर्कशॉपमध्ये स्वच्छता करावी, कर्मचार्‍यांना पिण्याचे शुद्ध पाणी उपलब्ध व्हावे यासह अन्य न्याय मागण्यांसाठी कर्मचार्‍यांची द्वारसभा झाली. सीआरएमएस भुसावळ मंडळ अध्यक्ष व्ही.के.समाधीया, मंडळ सचिव एस.बी.पाटील, झोनल कारखाना सचिव किशोर कोलते, सचिव अजित अमोदकर, संदेश इंगले, हरीचंद सरोदे यांनी प्रसंगी मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन एच.एच.सरोदे यांनी केले.










मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !