खिर्डी खुर्द येथील वयोवृद्धाची गळफास घेत आत्महत्या


खिर्डी : खिर्डी खुर्द गावातील वयोवृद्ध शेतमजुराने खळ्यातील छताला गळफास घेत आत्महत्या केली. ही घटना सोमवारी सकाळी सहा वाजेच्या सुमारास उघउकीस आली. अरविंद माधव भंगाळे (62) असे मयत वृद्धाचे नाव आहे. आत्महत्येचे स्पष्ट कारण कळू शकले नाही.

राहत्या घरात आत्महत्या
अरविंद भंगाळे यांनी सोमवारी पहाटे खळ्यातील छताच्या अँगलला दोर बांधून गळफास घेतला. या प्रकरणी निंभोरा पोलीस स्टेशनला दुर्गेश अंबादास भंगाळे (42) यांच्या खबरीनुसार निंभोरा पोलिस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. मयताच्या पश्चात पत्नी, मुलगा, सून असा परीवार आहे. रावेर ग्रामीण रुग्णालयात मृतदेह शवविच्छेदनासाठी हलवण्यात आला. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक गणेश धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक नितीन पाटील करीत आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !