विद्यार्थ्यांनो इकडे लक्ष द्या : उद्या लागणार बारावीचा निकाल


जळगाव : बारावी परीक्षेचा बुधवार, 8 रोजी निकाल लागणार असल्याने विद्यार्थ्यांमध्ये धडधड वाढली असून पालकांसह विद्यार्थ्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. कोरोनामुळे दोन्ही वर्ष दहावी आणि बारावी दोन्हीच्या परीक्षाही ऑनलाईन आणि निकालही ऑनलाईन जाहीर झाला मात्र यंदा दहावी आणि बारावीच्या परीक्षा यंदा ऑफलाईन पद्धतीने घेण्यात आल्या आहेत त्यामुळे निकालाकडे लक्ष लागले आहे.

ऑफलाईन पद्धतीने झाल्या परीक्षा
गेल्या वर्षी कोरोना प्रादुर्भावामुळे परीक्षा झाल्या नव्हत्या. पण यंदा मात्र कोरोना आटोक्यात असल्यानं दहावी आणि बारावीच्या परीक्षा ऑफलाईन पद्धतीनं घेण्यात आल्या. आता मात्र विद्यार्थी आणि पालकांना निकालाची प्रतिक्षा होती. दरम्यान, निकालाची सर्व प्रक्रिया पूर्ण झाली असल्याची माहिती शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी आधीच दिली होती. निकाल लवकरच जाहीर करण्यात येईल, असंही त्यांनी म्हटलं. राज्यातील बारावीच्या सर्व विद्यार्थी पालकांचं हे बारावीच्या निकालाच्या लक्ष लागले असतानाच बुधवारी दुपारी हा निकाल जाहीर केला जाणार आहे. त्यामुळे लवकरच दहावीच्या निकालाची तारीखही जाहीर केली जाण्याची शक्यता आहे.










मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !