धुळ्यातील अवैध सावकारी प्रकरण : राजेंद्र बंबच्या लॉकरमधून अडीच कोटींच्या रोकडसह 2400 एफ.डी.जप्त
धुळे : राज्यात धुळ्यातील अवैध सावकारी प्रकरण मोठ्या प्रमाणावर गाजत असून योगेश्वर पतपेढीतील लॉकरची आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने तपासणी केली असता त्यात पुन्हा घबाड हाती आले आहे. राजेंद्र बंब यांचे 7 लॉकर तपासण्यात आले असून त्यातील दोन कोटी 47 लाखांची रोकड, 210 सौदा पावत्या-खरेदी खत, 100 कोरे धनादेश, विदेशी चलन, सहा लाख किंमतीचे चार ग्रॅम वजनाचे सोन्याचे 34 कॉईन व दोन कोटीपेक्षा अधिक किंमतीच्या 2400 एफ.डी.पोलिसांनी जप्त केल्या आहेत.
अल्पवयीन मुलीचा विनयभंग : तरुणाला अटक
15 कोटींची मालमत्ता जप्त
राजेंद्र बंब यांच्याकडे आतापर्यंत नऊ कोटींपेक्षा अधिकची रोकड आणि सहा कोटींपेक्षा अधिकचे दागिने, यासह कोट्यवधी रुपयांच्या मालमत्तेची कागदपत्रे जप्त करण्यात आले. बँकेतील काही लॉकरची तपासणी बाकी असल्याने पोलिस कोठडी वाढवून मागण्यात आल्याने न्यायालयाने पाच दिवसांसाठी पोलिस कोठडी वाढवून दिली आहे.
भुसावळ तालुक्यातील तीन गावांमध्ये एकाचवेळी चोरट्यांनी 11 घरे फोडली







