नागादेवी येथे दारूच्या नशेत विवाहितेचा विनयभंग
यावल : सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या नागादेवी येथे दारूच्या नशेत महिलेचा विनयभंग करण्यात आला शिवाय महिलेस जीवे ठार मारण्याची धमकी देण्यात आली. 45 वर्षीय विवाहितेने यावल पोलिसात दिलेल्या फिर्यादीनुसार तिचे पती हे लग्नाला गेल्याने विवाहिता रात्री घरी एकटी असताना रात्री 11 वाजेच्या सुमारास याच आदिवासी पाड्यावरील गुड्या भायला मानकर याने दारूच्या नशेत अविवाहितेवर अतिप्रसंगाचा प्रयत्न केला व तिचा विनयभंग केला. हा प्रकार कुणास सांगितला तर तुला जिवंत सोडणार नाही, अशी धमकी देवून पळ काढला. पुढील तपास सहाय्यक फौजदार नितीन चव्हाण करीत आहे.

