भुसावळातील तरुणाचे खून प्रकरण : दोघा आरोपींना 13 पर्यंत कोठडी


भुसावळ : शहरातील रामदेव बाबा नगरातील रोहित दिलीप कोपरेकर (21) या तरुणाच्या खून प्रकरणी संशयीत आरोपी सागर दगडू पाटील (22, भुसावळ) व राहुल राजेश नेहते (19, पाटीलमळा, भुसावळ) यांना बाजारपेठ पोलिसांनी अटक केली होती. संशयीतांना न्यायालयात हजर केली असता न्यायालयाने 13 पर्यंत पोलिस कोठडी सुनावली. दरम्यान, आरोपींकडून ठोस खुनाचे कारण समोर आले नसलेतरी पार्टीत झालेल्या वादानंतर त्यांनी रोहितची हत्या केल्याची प्राथमिक माहिती दिली आहे.

पोलिस चौकशीत सत्य येणार समोर
रोहित दिलीप कोपरेकर (21) या तरुणाचा खून करून मृतदेह वांजोळा रोडवरील गंगानगर पाठीमागील गोपाळ सावळे यांच्या शेतात कुजलेल्या अवस्थेत आढळला होता. मृतदेहाच्या अंगावरील पँट व चप्पलेवरून पोलिसांनी मिसींग रजिस्टरच्या आधारे मयताची ओळख पटवली होती तर वांजोळा रोडवरील हॉटेल गब्बरमध्ये मयत व संशयीत पार्टी करताना आढळल्याने पोलिसांचा दोघा संशयीतांवर संशय बळावला होता.

खुनाचे ठोस कारण समोर येईना
एकास डोंबिवलीतून तर दुसर्‍याला भुसावळातून अटक करण्यात आली. पार्टी झाल्यानंतर वाद उफाळल्याने रोहित कोपरेकर यास गळफास दिला व नंतर त्याच्या डोक्यात दगड टाकून त्याची हत्या केली, अशी कबुली संशयीतांनी पोलिसांना दिली आहे मात्र पोलिसांकडून आणखी खोलात जावून तपासाला वेग देण्यात आला आहे. तपास पोलिस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.


कॉपी करू नका.